दिवाळीच्या आधी (Diwali 2023) सगळेचजण फराळ बनवण्याच्या तयारीत असतात. विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेल्या फराळ खाण्याचा आनंद काही वेगळाच. (Bhajani Chakali Kashi Karavi) पण फराळ करणं वाटतं तितकं सोपं नाही कधी पीठ दळण्यापर्यंत पदार्थ डब्यात भरेपर्यंत अनेक लहान सहान गोष्टींची काळजी घ्यावी लागते. (Diwali Chakali Recipe) फराळाचं ताट समोर आलं की सगळ्यात आधी संपते ते म्हणजे चकली. (Diwali Special Faral Making Tips)
खुसखुशीत, काटेरी चकल्या पाहिल्या की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाच्याच तोंडाला पाणी सुटतं. (Diwali Faral Making tips) घरी बनवलेल्या चकल्या दातांनी तुटणार नाही इतक्या कडक होतात तर कधी भजीसारख्या मऊ पडतात अशी तक्रार अनेकाची असते. चकली कुरकुरीत, खमंग होण्यासाठी काही लक्षात ठेवल्या तर चकल्या अजिबात कडक किंवा मऊ होणार नाहीत. परफेक्ट भाजणी चकली बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How to Make Chakali For Diwali)
दिवाळीसाठी चकली बनवताना कोणत्या चुका टाळाव्यात? (Avoid These Mistakes While Chakali Making)
1) चकलीसाठी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. पण ज्या तांदळाचा भात चिकट होतो किंवा जे तांदूळ नवीन आहेत असे तांदूळ घेऊ नका.
२) चकली बनवण्यासाठी तुम्ही जे काही साहित्य घ्याल ते व्यवस्थित भाजलेलंच असावं. मंच आचेवर पदार्थ भाजून घ्या. अन्यथा भाजणी परफेक्ट बनत नाही आणि लगेच नरम पडते.
३) चकली तयार करताना तुटू नये म्हणून १ चमचा साबुदाणा भाजणीत वापरा.
४) भाजणीचे पीठ दळायला देताना एक लक्षात ठेवा ते म्हणजे भाजणी व्यवस्थित थंड झाल्यानंतरच दळून आणा. यामुळे भाजणी ३ ते ४ महिने आरामात टिकते.
५) भाजणी दळताना गिरणीमध्ये आधी तांदूळ किंवा ज्वारी दळलेली असावी. कारण गव्हावर ही भाजणी दळली तर चकली बिघडू शकते.
थंडीच्या दिवसाही दुप्पट फुलेल इडलीचं पीठ; तांदूळ वाटताना हा पदार्थ मिसळा, मऊ होतील इडल्या
६) चकली तेलात घातल्यानंतर गॅस मंद किंवा जास्त उच्च आचेवर न ठेवता मध्यम आचेवर ठेवा. मंद आचेवर ठेवल्यानं चकली कच्ची राहते तर उच्च आचेमुळे चकली जास्त करपू शकते म्हणून मध्यम आचेवर ठेवा.
भाजी करताना रस्सा थोडा घट्ट होण्यासाठी काय करायचं? ५ टिप्स-हॉटेलसारख्या भाज्या होतील घरी
७) चकलीत तेलाचे मोहन योग्य प्रमाणात घातले नाही तर चकल्या कुरकुरीत होत नाहीत म्हणून भाजणीच्या पीठाची जर तुम्ही उकड काढत नसाल तर त्यात मोहन नक्की घाला.