Join us  

१५ मिनिटांत बनेल १ किलो मुरमुऱ्याचा चिवडा, जराही मऊ होणार नाही-घरीच जमेल परफेक्ट खमंग चिवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 12:31 PM

Diwali Special faral Recipe in Marathi : या चिवड्यासाठी ट्रान्सपरन्ट दिसणारे कुरमुरे न घेता जाड कुरमुरे निवडा.

दिवाळीला (Diwali 2023) अवघे काही दिवस उरलेत  चिवडा, चकली, लाडू, अनारसे असे फराळाचे पदार्थ बनवले जातात. (Murmura Chivda Recipe) चकली, करंजी हे पदार्थ बनवायला अवघड वाटतात कारण घरी बनवूनही हे पदार्थ बिघडण्याची शक्यता असते म्हणून बरेच लोक हे पदार्थ घरी बनवणं टाळतात. (Diwali Special Faral Making) घरच्याघरी करायला सोपा आणि खायला चविष्ट, चवदार असा पदार्थ म्हणजे चिवडा.

प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार पोह्याचा, मक्याचा तर कोणी कुरकुऱ्याचा हलका फुलका चिवडा बनवणं पसंत करतात. मुरमुऱ्याचा चिवडा नरम पडतो तर कधी  मसाला व्यवस्थित एकजीव होत नाही अशी तक्रार अनेकजणी करतात.  खमंग कुरमुऱ्यांचा चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Diwali Special faral Recipe in Marathi)

मुरमुऱ्यांचा चिवडा करण्याची योग्य पद्धत (Murmure Chivda Recipe)

१) सगळ्यात आधी अर्धा किलो मुरमुरे घ्या. ट्रान्सपरन्ट दिसणारे कुरमुरे न घेता जाड मुरमुरे निवडा.  हे मुरमुरे एका गाळणीत ठेवून गाळून घ्या. गाळल्यानंतर त्यातील बारीक भूगा निघून जाईल. 

२) चटणी बनवण्यासाठी  १५ ते २० लसणाच्या पाकळ्या घ्या. यात २ चमचे लाल तिखट घालून जाडसर ठेचून घ्या. ही लसणाची चटणी  चिवड्याला फरफेक्ट चव देते. 

चकली कडक होईल की वातड-परफेक्ट जमेल ना? भाजणी करताना लक्षात ठेवा ७ टिप्स-कुरकुरीत बनेल चकली

३) कढईत तेल घालून त्यात जीरं, शेंगदाणे घालून खमंग होईपर्यंत तळून घ्या. शेंगदाणे अर्धवट तळून झाले की त्यात भाजलेली चण्याची डाळ घाला. नंतर  त्यात कढीपत्ता घाला. तुम्ही आवडीनुसार कढीपत्ते कमी जास्त घालू शकता. कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. सर्व पदार्थ तळत असताना गॅस मंच आचेवर असायला हवा.

४) अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर तेलात घालून फ्राय करून घ्या. कोथिंबीर कुरकुरीत झाली  हे सर्व तळलेलं साहित्य एका ताटात काढून घ्या. नंतर त्यात  तेलात सुरूवातीला तयार केलेली लसणाची चटणी २ चमचे घाला, त्यात १ चमचा हळद, २ चमचे धणे पावडर, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा चाटमसाला घाला. मसाले परतत असताना गॅस मंच आचेवर ठेवा किंवा गॅस बंद करून ठेवा. 

थंडीच्या दिवसाही दुप्पट फुलेल इडलीचं पीठ; तांदूळ वाटताना हा पदार्थ मिसळा, मऊ होतील इडल्या

५) मसाल्यांमध्ये गाळलेले मुरमुरे घालून एकजीव करून घ्या. मुरमुरे व्यवस्थित  भाजून कुरकुरीत झाले की एका मोठ्या परातीत काढून घ्या. त्यात १ ते २ चमचे पिठीसाखर घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर फ्राय केलेले साहित्य त्यात घाला.  आवडीनुसार तुम्ही यात जाड शेव, फरसाण किंवा मक्याचा चिवडा घालून मिसळू शकता. तयार आहे १ किलोचा  कुरकुरीत, खमंग मुरमुऱ्यांचा चिवडा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स