Join us  

आता अनारसे फसणार नाहीत तर हसणार ! कुरकुरीत, जाळीदार, हलके - फुलके अनारसे होतील सहज सोपे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2023 12:21 PM

Diwali Special : How To Make Anarase Traditional Authentic Maharashtrian Delicacy Make It Perfect : फराळ बनवताना एवढा घाट घालून केलेले अनारसे ऐनवेळी बिघडले तर ? यासाठी हे सोपे १० उपाय...

आत्तापर्यंत सगळ्यांच्याच घरी दिवाळी फराळ बनवण्याची तयारी अतिशय जोरदार सुरु असेलच. एव्हांना काहींचा फराळ बनून खाण्यासाठी तयार असेल, तर काहीजण फराळ बनवण्याच्या तयारीत असतील. फराळ म्हटला की तो वर्ष भरातून दिवाळीत एकदाच बनवला जातो. त्यामुळे घरची गृहिणी आवर्जून फराळाचे सगळे पदार्थ करण्याचा घाट घालते. या फराळाच्या पदार्थांमध्ये लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळे, अनारसे असे अनेक पदार्थ असतात(Instant Anarsa).

फराळाच्या पदार्थातील काही पदार्थ बनवणे हे अतिशय सोपे असते. याउलट काही पदार्थ बनवणे म्हणजे अत्यंत नाजूक किंवा कठीण काम असते. अशा नाजूक  व कठीण काम असणाऱ्या फराळाच्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे अनारसा. मस्त गोड चवीचा, सुंदर, नाजूक जाळीदार, कुरकुरीत अनारसा खाणे याहून मोठे सुख नाही. अनारसा खाण्यासाठी खूप स्वादिष्ट लागत असला तरीही तो बनवण्यासाठी खूप मोठा घाट घालावा लागतो. अनारसा बनवण्यासाठीचा एवढा घाट घातल्यानंतरही काहीवेळा हे अनारसे (How To Make Perfect Aanarasa) फसतात. अनारसे बनवणं हे अत्यंत नाजूक काम आहे ते अत्यंत बारकाईने करणे महत्वाचे असते. अनेकदा कितीही काळजी घेऊन देखील हे अनारसे (Diwali Faral special Anarase) बिघडतात. अनारसे तळताना विरघळतात, जाळीदार बनत नाहीत, पीठ कच्च राहत, पीठ भुसभुशीत होत असे होऊ नये म्हणून अनारसे बनवताना नेमकी कोणती काळजी घ्यावी(How to make Anarsa - A Maharashtrian delicacy made of rice flour and jaggery).

अनारसे बनवताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ? 

१. अनारसे बनवताना तांदूळ नेहमी जुना घ्यावा. ज्या तांदुळाचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्यावा. तांदुळातील पाणी  रोज बदलावे. अनारसा बनवण्यासाठी कोलम, बासमती तुकडा तांदूळ घ्यावा. 

२. तांदूळ वाळवताना ते उन्हांत सुकवू नये, तांदूळ खूप वेळासाठी सुकत न ठेवता फॅनखाली पटकन वाळवून घ्यावेत. सुकलेल्या तांदळाला हात लावल्यानंतर ते थोडे थंड असायला हवेत. 

३. पिठात गूळ घालताना तो किसूनच घालावा म्हणजे पीठ मळताना सोपे जाते व व्यवस्थित पीठ मळून होते. 

शनिवार - रविवारची सुटी म्हणून सगळा फराळ एकाचवेळी करता ? ९ टिप्स - फराळ होईल सुटसुटीत - बिघडणारही नाही...

४. पिठामध्ये गूळ घालण्यागोदर थोडेसे वाटीभर पीठ बाजूला काढून घ्यावे. (पीठ पातळ झाले तर अशावेळी हे सुके पीठ वापरता येते.)

५. पीठ घट्ट असेल तर तुपाचा हात लावून मळावे, किंवा खूपच कोरडे वाटत असेल तर केळं (१ लहान तुकडा) कुस्करून त्या पिठात मिक्स करावा.

६. पिठाला किती ओलसरपणा आहे हे तपासूनच त्यात थोडा थोडा गूळ घालावा. एकाचवेळी खूप गूळ घातला तर पीठ पातळ होऊ शकते.  

चकली भाजणी करण्याचे हे घ्या परफेक्ट प्रमाण ! चकली चुकूनही बिघडणार नाही, फसणार नाही...

   ७. अनारश्याचे पीठ मळवताना तूपाचा हात लावून एकजीव होईपर्यंत मळून घ्यावे. अनारशाची कणिक चांगली मळून घ्यावी आणि एक पारदर्शक प्लास्टिक स्वच्छ धुऊन त्याला मधून तुपाचा हात लावून सारणाचा बारीक गोळा घ्यावा आणि त्याला गोलाकार आकार देत अनारसे तयार करुन घ्यावेत. 

८. अनारसे विरघळत असतील तर पिठात रवा घालून पीठ परत भिजवून रात्रभर बाहेर ठेवा व दुसऱ्यादिवशी अनारसे करा. याचबरोबर, पीठ पातळ झाल तर तांदळाचे पीठ मिक्स करा व पीठ पुन्हा दोन दिवस भिजत ठेवा मग अनारसे बनवा.  

दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

दिवाळीच्या सुटीत मुलं म्हणणारच आई आज काय स्पेशल ? पालक - मेथी पुऱ्यांची घ्या झटपट रेसिपी-खुसखुशीत खाऊ...

९. अनारसे तळताना विरघळत असतील तर कोरड्या पिठात २ चमचे गरम तूप घातल्याने ते कुरकुरीत मस्त हल्के जाळीदार होतात.

१०. अनारसे पीठ व्यवस्थित मुरले तरच अनारसे विरघळत नाही त्यामुळे ते चांगले भिजू द्यावे  आणि त्यानंतरच या पिठाचे अनारसे बनवावेत.

टॅग्स :दिवाळी 2023अन्नपाककृतीकिचन टिप्स