Lokmat Sakhi >Food > पाक न करता करा रव्याचे तोंडात विरघळणारे झटपट लाडू, लाडू बिघडण्याचं टेंशनच नाही..

पाक न करता करा रव्याचे तोंडात विरघळणारे झटपट लाडू, लाडू बिघडण्याचं टेंशनच नाही..

Diwali Special : Instant Rava Ladoo without Sugar Syrup : पाक बिघडतो-लाडू नीट वळले जात नाही? मग बिनापाकाचे लाडू करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2023 02:12 PM2023-11-09T14:12:39+5:302023-11-09T14:13:28+5:30

Diwali Special : Instant Rava Ladoo without Sugar Syrup : पाक बिघडतो-लाडू नीट वळले जात नाही? मग बिनापाकाचे लाडू करून पाहा..

Diwali Special : Instant Rava Ladoo without Sugar Syrup | पाक न करता करा रव्याचे तोंडात विरघळणारे झटपट लाडू, लाडू बिघडण्याचं टेंशनच नाही..

पाक न करता करा रव्याचे तोंडात विरघळणारे झटपट लाडू, लाडू बिघडण्याचं टेंशनच नाही..

दिवाळीत (Diwali) गोड पदार्थांमध्ये सर्वात आधी लाडूचा डबा लवकर संपतो. लाडू अनेक प्रकारचे केले जातात. रवा, शेव, बुंदीचे लाडू आपण खाल्लेच असतील. हे लाडू करताना साखरेच्या पाकाचा वापर होतो. पाकामुळे लाडू व्यवस्थित गोल आकारात वळवून तयार होतात. पण आपण कधी रव्याचे तेही बिना पाकाचे लाडू खाऊन पाहिलं आहे का?

अनकेदा पाक बिघडतो, ज्यामुळे लाडू देखील नीट वळले जात नाही. तर काहींना कमी गोडाचे लाडू आवडतात. जर आपल्याला पाकाचा वापर न करता लाडू तयार करायचे असतील तर, ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. काही मिनिटात बिना पाकाचे तोंडात विरघळणारे लाडू तयार होतील. चला तर मग बिनापाकाचे रव्याचे लाडू कसे तयार करायचे पाहूयात(Diwali Special : Instant Rava Ladoo without Sugar Syrup).

बिनापाकाचे रव्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

अर्धा किलो बारीक रवा

४०० ग्रॅम पिठीसाखर

कुकरमध्ये इडली किंवा खिचडी होते, दही कधी लावून पाहिलं आहे का? १ सोपी ट्रिक- दही करण्याची नवी युक्ती

१५० ग्रॅम साजूक तूप

ड्रायफ्रुट्स

वेलची पावडर

कृती

सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात ३ मोठे चमचे साजूक तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात  अर्धा किलो बारीक रवा घालून भाजून घ्या. रवा मध्यम आचेवर भाजून घ्या, जेणेकरून रवा छान भाजला जाईल. रवा भाजताना आपण त्यात उरलेलं तूप घालून पुन्हा भाजून घ्या. रव्याला सोनेरी रंग आल्यानंतर त्यात अर्धा कप दूध घालून मिक्स करा. ४ ते ५ मिनिटे मिक्स केल्यानंतर त्यात ४०० ग्रॅम पिठीसाखर घालून साहित्य एकजीव करून घ्या.

सकाळी वेळ नाही म्हणून रात्रीच पीठ मळून ठेवता? फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्या खाणं योग्य की अयोग्य?

जर साहित्य कोरडं वाटत असेल तर, आपण त्यात आणखी एक चमचा साजूक तूप घालू शकता. नंतर त्यात एक चमचा वेलची पावडर घालून मिक्स करा. साहित्य एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करा, व त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर त्यात चिरलेले ड्रायफ्रुट्स घाला, व हाताने मिक्स करा. नंतर हाताला तूप लावून लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे बिनापाकाचे रव्याचे लाडू खाण्यासाठी रेडी.

Web Title: Diwali Special : Instant Rava Ladoo without Sugar Syrup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.