Lokmat Sakhi >Food > Karanji Recipe :  करंजा फुटतात, सारणात तेलं शिरतं? 'या' टिप्सनी घरीच बनवा ५ प्रकारच्या परफेक्ट खुसखुशीत करंजा

Karanji Recipe :  करंजा फुटतात, सारणात तेलं शिरतं? 'या' टिप्सनी घरीच बनवा ५ प्रकारच्या परफेक्ट खुसखुशीत करंजा

Diwali Special Crispy Karanji Recipe : करंजी तयार करताना काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचं काम आणखी सोपं होऊ शकतं याशिवाय पदार्थ बिघडण्याची शक्यताही कमी असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:44 PM2021-10-26T17:44:08+5:302021-10-26T17:45:15+5:30

Diwali Special Crispy Karanji Recipe : करंजी तयार करताना काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचं काम आणखी सोपं होऊ शकतं याशिवाय पदार्थ बिघडण्याची शक्यताही कमी असते.

Diwali Special karanji Recipe : Easy and quick karanji recipe in marathi | Karanji Recipe :  करंजा फुटतात, सारणात तेलं शिरतं? 'या' टिप्सनी घरीच बनवा ५ प्रकारच्या परफेक्ट खुसखुशीत करंजा

Karanji Recipe :  करंजा फुटतात, सारणात तेलं शिरतं? 'या' टिप्सनी घरीच बनवा ५ प्रकारच्या परफेक्ट खुसखुशीत करंजा

दिवाळीत (Diwali 2021) फराळाच्या इतर पदार्थांबरोबरच करंजा खाण्याचीही सगळ्यांची इच्छा होते. पण फराळ बनवणं काही खायचं काम नाही!  करंजा बनवायला खूप वेळ लागतो तर कधी पुरेपूर वेळ देऊन मुबलक साहित्य वापरूनही करंज्या हव्या तश्या बनत नाहीत. म्हणून अनेक बायका घरी करंजा बनवणं टाळतात. (Diwali Faral Recipe) दोन, तीन पदार्थ घरी बनवून बाकीचे पदार्थ ऑर्डर केले जातात.

करंजी तयार करताना काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचं काम आणखी सोपं होऊ शकतं याशिवाय पदार्थ बिघडण्याची शक्यताही कमी असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला करंजी चांगली येण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. (Tips For Perfect karanji)

१) करंज्या खुसखुशीत येण्यासाठी पीठ मळण्याआधी मोहन शक्यतो तुपाचे घालावे. चांगले तूप नसेल तर तेलाचे मोहनही चालते. मोहन थंड झाल्यावर पीठाला चांगले मळून घ्यावे. 

२) करंजीच्या वरच्या आवरणासाठी भिजवलेलं पीठ कडक होऊ नये यासाठी पीठ भिजवल्यानंतर सुती कपडा ओला करुन तो त्याभोवती गुंडाळून ठेवा जेणेकरून शेवटपर्यंत पीठ मऊ राहिल.

३) करंजीच्या अनेकदा तेलात फुटतात. त्यामुळे आतले सारण तेल खराब करतं असे होऊ नये म्हणून त्या कडांना कापसाच्या बोळ्याने दूध लावून काठ घट्ट बंद करावेत.

४) करंज्या नेहमी मंद आचेवर तळण्याचा प्रयत्न करावा. पीठ मळणाताना तेलाचं मोहन, मीठ, पाणी एकत्र फेसून घ्यावे आणि त्यात मैदा घालावा. 

५)  करंजीच्या सारणातील पिठी साखर घरी बनवलेली असल्यास उत्तम. ती विकत आणल्यास काही वेळेस त्यात ओलसरपणा असेल, तर त्याला वास येण्याची शक्यता असते. 

करंजी रेसेपीज (karanji recipe)

1) रव्याची कंरजी (Rava karanji)

२) गुळाजी सांरोजी (gul sanjori)

३) साठ्याची करंजी (Satha karanji recipe)

४) साटाची लेयर करंजी (Sarachi Layer karanji)

५) मैद्याची करंजी (Maida karanji)

६) करंजीचं परपेक्ट सारण (Stuffing for karanji)

Web Title: Diwali Special karanji Recipe : Easy and quick karanji recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.