चकली, लाडू बनवणं (Diwali Faral) बऱ्याचजणांना अवघड वाटतं म्हणून अनेकजण फराळाचे हे पदार्थ बाहेरून आणतात पण हलका, फुलका चिवडा करायला सोपा आणि कमीत कमी वेळेत तयार होणारा असल्यामुळे अनेकजण घरीच हा चिवडा बनवतात. (Patal Poha chivda recipe) पातळ पोहे म्हटलं की चिवडा आकसतो तरी कधी चिवडा जास्त वातड होतो. डब्यात भरून ठेवलेला चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहावा यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील. (How to make poha chivda at home)
पातळ पोह्यांचा चिवडा परफेक्ट बनवण्यासाठी टिप्स (Poha Chivda Making Tips)
१) आधी कढईत पोहे घालून मगच गॅस ऑन करा. कारण जर तुम्ही आधी गॅस ऑन केला आणि कढई जास्त गरम झाली तर पोहे पातळ असल्यामुळे जळण्याची शक्यता असते.
२) पोहे भाजत असताना ढवळत राहा जेणेकरून करपणार नाहीत आणि करपट वास येणार नाही
३) पोह्याच्या चिवड्यात पातळ खोबऱ्याचे काप घालायचे असतील तर तुम्ही वेफर्सच्या किसणीचा वापर करा. जेणेकरून पातळ काप तयार होतील. खोबऱ्याचे काप मंद आचेवर तेलात तळून घ्यावेत.
१५ मिनिटांत बनेल १ किलो मुरमुऱ्याचा चिवडा, जराही मऊ होणार नाही-घरीच जमेल परफेक्ट खमंग चिवडा
३) चिवड्यात घालण्यासाठी मिरच्या तळताना त्यात थोडं मीठ घाला जेणेकरून चिवड्याचा तिखटपणा कमी होईल.
४) मिरच्या व्यवस्थित तळून कुरकुरीत होतील याची खात्री करा. जर मिरच्या नीट तळल्या गेल्या नाहीत तर चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते.
खमंग, चटपटीत पोह्यांचा चिवडा करण्याची योग्य पद्धत (How to Make Crispy Poha Chivda at Home)
१) अर्धा किलो पातळ पोहे घ्या. गाळणीत घालून हे पोहे गाळून घ्या. पोह्यांमधील बारीक कण, धूळ निघून जाईल असे पाहा. जर तुमच्याकडे जास्तवेळ असेल तर तुम्ही पोहे उन्हात १५ ते २० मिनिटांसाठी ठेवा ज्यामुळे चिवडा जास्त कुरकुरीत होतो. चाळून घेतलेले पोहे सगळ्यात आधी भाजून घ्या. बोटांनी चुरल्यानंतर पोह्यांचा भूगा होत असेल तर पोहे व्यवस्थित भाजले गेलेत असं समजा. भाजलेले पोहे थंड होण्याकरीता एका परातीत काढून घ्या.
१ किलो भाजणीची चकली- कुरकुरीत, काटेरी चकलीसाठी पिठात 'हा' पदार्थ मिसळा; परफेक्ट बनेल
२) दुसऱ्या एका ताटात १ वाटी शेंगदाणे, १ वाटी भाजलेली चण्याची डाळ, वाटी खोबऱ्याचे काप, पाव वाटी ठेचलेला लसूण घ्या, पाव वाटी हिरव्या मिरच्यांचे काप, अर्धी वाटी बदामाचे काप, अर्धी वार्टी काजूचे काप घ्या आणि २० ते २५ पानं कढीपत्ता घ्या.
३) चिवड्याच्या मसाल्यासाठी ४ चमचे धणे पावडर, २ चमचे आमसूल पावडर, २ चमचे बारीक केलेली बडीशेप, २ चमचे जीरं पावडर आणि अर्धा ते एक चमचा तिखट आणि २ चमचे हळद घ्या, ३ चमचे पीठीसाखर आणि, चवीनुसार मीठ घ्या. लाल तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
४) कढईत तेल गरम करून घ्या. त्यात सगळ्यात आधी खोबऱ्याचे काप तळून घ्या. नंतर शेंगदाणे मंद आचेवर तळून घ्या अर्धा ते पाऊण मिनिटांत शेंगदाणे तळून होतील नंतर बदाम आणि काजूचे काप, चण्याची डाळ तळून घ्या, नंतर तेलात मिरच्या आणि कढीपत्ता तळून घ्या. हे सर्व साहित्य भाजलेल्या पोह्यांवर घाला. मग लसूण तळून घ्या लसूण तळून झाल्यानंतर पोह्यांवर घाला.
५) सर्व साहित्य पोह्यांमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्या. कढईतले निम्म तेल कमी करून त्यात वरील सर्व मसाले आणि मीठ घाला. तेलात पिठीसाखर घालू नका. फोडणी तयार झाल्यानंतर पोह्यांवर घालून एकजीव करा. सगळ्यात शेवटी यात पिठीसाखर घालून एकजीव करून घ्या. तुम्ही यात आवडीनुसार फरसाण किंवा शेव घालू शकता. तयार आहे गरमागरम कुरकुरीत पोह्यांचा चिवडा.