Join us  

Shankarpali Recipe : खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या शंकरपाळींसाठी 'या' टिप्स; एकदा खाल खात राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:37 AM

Diwali Special Shankarpali Recipe Cooking tips : शंकरपाळी खुसखुशीत येण्यासाठी पीठ मळण्याआधी तुपाचं मोहन घालायला विसरू नका. 

दिवाळी म्हटलं की फराळ बनवण्याची लगबग  घरोघरी सुरू होते. लाडू, चिवडा, चकली यासंह शंकरपाळींचा फराळ (Diwali faral recipe) सगळ्यांनाच आवडतो. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार खारट, गोड शंकरपाळींचा आस्वाद घेतो. अनेकांना गोड शंकरपाळी चहाबरोबर खायला आवडतात तर काहींना मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर शंकरपाळ्या खाण्याची इच्छा होते. (How to make perfect shankarpali)

फराळाचे बरेच पदार्थ बनवताना भरपूर तेल, तूप, पीठ वापरलेली असतात अशावेळी केलेली मेहनत वाया जाऊ नये आणि पदार्थ उत्तम बनावेत अशीच गृहिणींची इच्छा असते. अशावेळी शंकरपाळ्या बनवताना काही सोप्या ट्रिक्स (Tips for perfect shankarpali) लक्षात ठेवल्या तर उत्तम पदार्थ बनतील. 

1) शंकरपाळी खुसखुशीत येण्यासाठी पीठ मळण्याआधी तुपाचं मोहन घालायला विसरू नका. 

२) गोड शंकरपाळयामध्ये आपण केवळ बारीक साखर आणि तुप  याचा वापर करा. दूध किंवा पाणी न घातल्यास किंवा कमी घातलं  तरच शंकरपाळ्या मऊ आणि खुसखुशीत होतात. जर तुम्ही मैद्याच्या शंकरपाळ्या बनवत असाल तर त्यात पाणी वापरू नका. 

३) गोड शंकरपाळ्यांमध्ये तुम्ही बारीक रवा सुद्धा घालू शकता. त्यामुळे शंकरपाळ्यांना लालसर रंग येतो आणि चवीला चांगल्या लागतात.

४) शंकरपाळ्या कापताना अगदी हळुवारपणे एकसारखे काप कापावे आणि सुती कपडयावर सुकण्यास ठेवावे. हे काप एकावर एक ठेवू नयेत अन्यथा एकमेकांना चिटकतात. 

५) खारट शंकरपाळ्या करताना त्यात काळं मीठ वापरा. याशिवाय तुम्ही आवडीनुसार त्यात कस्तुरी मेथी घालू शकता. 

शंकरपाळी रेसिपीज (Shankarpali Recipe)

१)

२)

३)

४)

टॅग्स :दिवाळी 2021अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.