दिवाळी फराळाशिवाय अपूर्णच आहे. फराळातील वेगवेगळे पदार्थ म्हणजे दिवाळीचे खास आकर्षण असते. दिवाळीच्या फराळातील पदार्थ आजकाल वर्षभर सहज दुकानात मिळत असले तरी, पूर्वीच्या काळी हे फराळाचे पदार्थ खाण्यासाठी खास दिवाळीची वाट पाहिली जायची. दिवाळीच्या फराळातील खमंग, खुसखुशीत तिखट, गोड पदार्थ खाणे म्हणजे पर्वणीच असायची. फराळात लाडू, चिवडा, चकली, करंजी, शेव, शंकरपाळे असे पदार्थ पदार्थ तर हमखास सगळ्यांच्या घरी तयार केले जातात. परंतु बदलत्या काळानुसार, फराळातील काही पारंपरिक पदार्थांचा विसर पडत गेला, त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे तांदुळाच्या पिठाची गोड 'बोरं'(Tandalachi Bore).
ही 'बोरं' तयार करणंही खूप सोप आहे. सामानही फारस लागत नाही. तांदळाचं पीठ, गूळ, तीळ, पाणी आणि तेल एवढंच सामान पुरेसे असते. दिसायला फळातल्या बोरांसारखा (How To Make Tandalachi Bore At Home) आकार आणि रंग असल्याने यांना बोरं असं म्हटलं जात. दिवाळीच्या फराळात एक साधा, सोपा, सुटसुटीत, कमी जिन्नस असले तरीही झटपट होणारा असा खुसखुशीत फराळाचा पारंपरिक पदार्थ यंदाच्या दिवाळीत नक्की करुन पाहा(Diwali Special Traditional Tandalachi God Bore Easy To Make & Delicious).
साहित्य :-
१. भाजलेल्या तांदुळाचे पीठ - २ कप २. गरम पाणी - गरजेनुसार ३. रवा - १/२ कप ४. भाजलेले तीळ - १ टेबलस्पून ५. वेलची पूड - १/२ टेबलस्पून ६. भाजेलेलं खोबरं - १ टेबलस्पून ७. पिठीसाखर - २ टेबलस्पून ८. गूळ - २ टेबलस्पून ९. तेल - तळण्यासाठी
ना भाजणी - ना पीठ, नेहमीच्या चकलीला ट्विस्ट देत यंदाच्या दिवाळीत ट्राय करा शेजवान चिली चकली...
कोण म्हणते अनारसा करणे कठीण काम? ही घ्या झटपट अनारसे करण्याची कृती, खा जाळीदार अनारसे...
कृती :-
१. एका पॅनमध्ये ५ ते १० मिनिटे तांदूळ कोरडे भाजून घ्यावे. भाजलेले तांदूळ एका डिशमध्ये काढून ते थोडे गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून भाजलेल्या तांदुळाचे पीठ तयार करून घ्यावे. २. एका मोठ्या बाऊलमध्ये भाजलेल्या तांदुळाचे पीठ घेऊन त्यात गरम पाणी ओतून पीठ चमच्याने थोडे हलवून घ्यावे. ३. आता या पिठात रवा, भाजलेले तीळ, चवीनुसार वेलची पूड, भाजेलेलं खोबरं घालावे.
४. त्यानंतर एका भांड्यात थोडे गरम पाणी घेऊन या पाण्यांत पिठीसाखर व गूळ घालावे. हे दोन्ही पदार्थ पाण्यांत संपूर्णपणे विरघळेपर्यंत चमच्याने पाणी ढवळत राहावे. ५. हे गूळ व पिठीसाखरेचे पाणी गरजेनुसार पिठात घालून पीठ घट्ट मळून घ्यावे.६. या मळून घेतलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यावे. ७. कढईत तेल तापवून या गरम तेलात ही बोरं सोडून खरपूस आणि थोडा गडद गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावीत.
गरमागरम खुसखुशीत पारंपरिक गोड बोरं खाण्यासाठी तयार आहेत.