Lokmat Sakhi >Food > दिवाळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रिंक्स ऐवजी द्या ५ थंडगार पेय, दिवाळी होईल खास...

दिवाळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रिंक्स ऐवजी द्या ५ थंडगार पेय, दिवाळी होईल खास...

5 easy, delicious cocktail, juice recipes to impress your friends with on Diwali : फराळासोबत कोल्डड्रिंक्स देणे हा आता फारच जुना पर्याय झाला, यंदाच्या दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत कोल्डड्रिंकने न करता त्याऐवजी इतर हटके काय पर्याय आहेत ते पाहुयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2023 06:15 PM2023-11-06T18:15:25+5:302023-11-06T18:33:34+5:30

5 easy, delicious cocktail, juice recipes to impress your friends with on Diwali : फराळासोबत कोल्डड्रिंक्स देणे हा आता फारच जुना पर्याय झाला, यंदाच्या दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत कोल्डड्रिंकने न करता त्याऐवजी इतर हटके काय पर्याय आहेत ते पाहुयात.

Diwali Special Welcome Drink, Diwali Recipes Indian Welcome Drink Welcome Your Guests This Diwali With These 5 Non-Alcoholic Drinks | दिवाळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रिंक्स ऐवजी द्या ५ थंडगार पेय, दिवाळी होईल खास...

दिवाळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रिंक्स ऐवजी द्या ५ थंडगार पेय, दिवाळी होईल खास...

दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सगळेचजण दिवाळीच्या सणाची जय्यत तयारी करण्यासाठी घाई करत आहेत. दिवाळी सण म्हणजे आनंद, उत्साहाचा, जल्लोषाचा. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेचजण दिवाळी उत्साहात साजरी करतात. दिवाळी या सणानिमित्त फटाके फोडणे, नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत मजा करणे, विविध मिठाई आणि पदार्थांचा आस्वाद घेणे, गोड धोड खाणे हे सुरुच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण आपल्या प्रिजनांच्या भेटीगाठी घेतो. आपले नातेवाईक, मित्रपरिवार अशी अनेक मंडळी यानिमित्ताने आपल्याला भेटतात. या दिवसांत आपण आवर्जून एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा व भेटवस्तू एकमेकांना देतो(Diwali Special : Diwali Mocktails With A Healthy Twist).

दिवाळीच्या निमित्ताने आपल्या जवळचे पाहुणे मंडळी घरी शुभेच्छा देण्यासाठी येतात. अशावेळी गोडधोड मिठाया, फराळ देऊन आपण त्यांचा पाहुणचार तर करतोच. परंतु काहीवेळा या फराळासोबत काहीतरी थंडगार  म्हणून कोल्डड्रिंक्स देतो. परंतु या फराळासोबत कोल्डड्रिंक्स देणे हा आता फारच जुना पर्याय झाला. याचबरोबर हे केमिकल्सयुक्त कोल्डड्रिंक्स पिणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत कोल्डड्रिंकने न करता त्याऐवजी इतर हटके काय पर्याय आहेत ते पाहुयात(Diwali 2023: Welcome Your Guests This Diwali With These 5 Non-Alcoholic Drinks).

 कोल्डड्रिंक्स ऐवजी आपण काय देऊ शकतो ? 

१. ऑरेंज मॉकटेल :- ऑरेंज मॉकटेल बनवण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस, अँपल साइडर व्हिनेगर, आले, पुदिना व संत्र्याचा रस या सर्व साहित्याची गरज लागेल. सर्वप्रथम एका भांड्यात संत्र्याचा रस, लिंबाचा रस आणि अँपल साइडर व्हिनेगर घाला. त्यानंतर त्यात पुदिन्याची पाने थोडी बारीक करुन घालावी जेणेकरून त्याचा सुगंध येईल. आता त्यात काही बर्फाचे तुकडे, आल्याचे छोटे तुकडे घालून मिक्स करा. ऑरेंज मॉकटेल पिण्यासाठी तयार आहे. आता हे एका ग्लासमध्ये ओता. आपल्या आवडीनुसार आपण त्यात आणखीन बर्फाचे तुकडे घालू शकता. त्यानंतर हे मॉकटेल संत्र्याचे तुकडे आणि पुदिन्याच्या पानाने  सजवा. छान गार्निश करून ते पाहुण्यांना पिण्यासाठी सर्व्ह करा.

फराळाची राणी नाजूक चंपाकळी ! पारंपरिक सुंदर गोड पदार्थ दिवाळीत करा नक्की, पाहा रेसिपी...

२. गुलकंद सरबत :- सर्वप्रथम, एका ग्लासमध्ये एक चमचा गुलकंद, २ टेबलस्पून भिजवलेले चिया सीड्स, २ चमचे भिजवलेले डिंक, व २०० मिली दूध घालून मिश्रण चांगले मिक्स करा. साहित्य एकत्र मिक्स केल्यानंतर त्यात २ टेबलस्पून ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. अशा प्रकारे गुलकंदाचे सरबत पिण्यासाठी तयार आहे. 

मार्केट सारखी खमंग, कुरकुरीत, मसाला शेव बनवण्याची सोपी रेसिपी, चव अशी की शेव होईल फस्त...

३. कलिंगडाचे कुल सरबत :- सरबत करण्याठी पूर्ण पिकलेलं कलिंगड घ्यावं. गर काढून घ्यावा. कलिंगडचा गर, थोडा लिंबाचा रस, तुळशीची किंवा पुदिन्याची पाच ते सहा पानं, कलिंगडच्या चवीनुसार साखर कमी जास्त आणि थोडं मीठ घ्यावं. हे सर्व मिक्सरच्या भांड्यात एकत्र करावं आणि मिक्सरला फिरवून घ्यावं. हे मिश्रण गाळून घेतलं की कलिंगडचं सरबत तयार होतं. आपल्या आवडीनुसार आपण त्यात आणखीन बर्फाचे तुकडे घालू हे थंडगार सरबत पिण्यासाठी सर्व्ह करु शकता. 

४. अननसाचे सरबत :- अननसाचे थंडगार सरबत बनवणे खूपच सोपे आहे. अननसापासून तयार केलेले हे सरबत आरोग्यासाठी अतिशय निरोगी आणि चवीला अतिशय छान लागते. एक अननस सोलून मग कापून घ्या. त्याचे लहान तुकडे करुन ते  मिक्सरमध्ये घाला.  आता त्यात एक चमचा लिंबाचा रस, एक कप नारळाचे पाणी, काही पुदिन्याची पाने घालून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. त्यानंतर ते एका ग्लासमध्ये ओतून त्यात काही बर्फाचे तुकडे घाला. घरातील आलेल्या पाहुण्यांना देण्यासाठी थंडगार अननसाचे सरबत तयार आहे.

दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

५. बदाम थंडाई :- बदाम थंडाई बनवण्यासाठी सर्वप्रथम, एका कढईत दुध उकळवत ठेवा. दुध गरम झाल्यानंतर त्यात साखर घालून साधारण ५ मिनिटे उकळवा. यानंतर २-३ तास ​​भिजवलेले बदाम सोलून, मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर दुधात बदामाची पेस्ट घालून चांगले मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर मिश्रणाला एक उकळी द्या, यानंतर, दुध थंड होण्यासाठी थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा. अशा प्रकारे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बदामाची थंडाई तयार आहे. यावरून आपण चिरलेले बदाम, काजू, पिस्ते व इतर ड्रायफ्रुट्स बारीक करून सजवू शकता.

शनिवार - रविवारची सुटी म्हणून सगळा फराळ एकाचवेळी करता ? ९ टिप्स - फराळ होईल सुटसुटीत - बिघडणारही नाही...

Web Title: Diwali Special Welcome Drink, Diwali Recipes Indian Welcome Drink Welcome Your Guests This Diwali With These 5 Non-Alcoholic Drinks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.