Join us  

दिवाळी फराळ तळून झाल्यावर उरलेल्या तेलाचं काय करायचं? ते पुन्हा वापरणे आरोग्याला घातक असते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 5:01 PM

एकदा तळलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करुन खाणं आरोग्यासाठी घातक असते.

ठळक मुद्देपुन्हा पुन्हा तळलेले तेल आरोग्याला अतिशय हानीकारक असते ते वापरू नये.

मंजिरी कुलकर्णी

दिवाळीचा फराळ करुन झाला, पदार्थ तळून झाले की एक प्रश्न कायमच असतो की उरलेल्या तेलाचं काय करायचं? कुणी म्हणतं ते तेल भाजीआमटीला वापरुन टाकावे. कुणी त्यातच पुन्हा पुन्हा पदार्थ तळते. कुणी ते तेल न खाता सरळ फेकून देते. यातलं खरंखोटं काय? तळलेल्या तेलाचं नेमकं करायचं काय? आणि मुळात म्हणजे एकदा पदार्थ तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरावे का?तर त्या प्रश्नाचं एकच उत्तर की एकदा आपण ज्यात पदार्थ तळला, ते तेल उरलं तर ते तेल अजिबात वापरू नये. असे पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असू शकते.

(Image : google)

तळलेले तेल पुन्हा पुन्हा का वापरू नये?

१. तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असू शकते. त्या तेलाच्या पुर्नवापराने कॅन्सरसह अनेक घातक आजार होण्याची शक्यता असते.२. पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरल्याने खराब कॉलेस्टेरॉल वाढते.३. पुन्हा पुन्हा गरम केलेल्या तेलाच कॅन्सर कॉजिंग एजंट, पॉलिसायकलिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणतात ते हानीकारक घटक असतात. त्यानं कर्करोग होण्याचा धोका बळावतो.४. अनेकदा गरम केल्यानं तेलात विषारी प्रक्रिया सुरु होते.५. त्यातले चांगले घटक कमी होतात.६. म्हणून पुन्हा पुन्हा तळलेले तेल आरोग्याला अतिशय हानीकारक असते ते वापरू नये.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

 

टॅग्स :दिवाळी 2022अन्न