Lokmat Sakhi >Food > गूळ- खोबऱ्याचे मोदक तळताना कढईत फुटतात? ५ टिप्स, प्रत्येक मोदक होईल खमंग- कुरकुरीत 

गूळ- खोबऱ्याचे मोदक तळताना कढईत फुटतात? ५ टिप्स, प्रत्येक मोदक होईल खमंग- कुरकुरीत 

Maghi Ganesh Jayanti: गणेश जयंतीनिमित्त जर मोदक करणार असाल तर ते तळताना फुटू नयेत म्हणून या काही गोष्टींची काळजी घ्या.(why do modak get burst while frying in pan?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 13:52 IST2025-02-01T13:51:26+5:302025-02-01T13:52:22+5:30

Maghi Ganesh Jayanti: गणेश जयंतीनिमित्त जर मोदक करणार असाल तर ते तळताना फुटू नयेत म्हणून या काही गोष्टींची काळजी घ्या.(why do modak get burst while frying in pan?)

Do jaggeMaghi Ganesh Jayanti: 5 tips for making perfect modak, how to make modak perfectly, why do modak get burst while frying in panry-coconut modaks burst in the pan while frying? 5 tips, every modak will be delicious-crispy | गूळ- खोबऱ्याचे मोदक तळताना कढईत फुटतात? ५ टिप्स, प्रत्येक मोदक होईल खमंग- कुरकुरीत 

गूळ- खोबऱ्याचे मोदक तळताना कढईत फुटतात? ५ टिप्स, प्रत्येक मोदक होईल खमंग- कुरकुरीत 

Highlightsमोदक तळताना फुटतात आणि कढईमध्ये त्याचं सगळं सारण पसरून तेल खराब होतं, असा अनेक जणींचा अनुभव आहे.

गणपती बाप्पा हे अनेकांचं आवडतं आणि आराध्य दैवत. त्यामुळे गणपतीची उपासना अनेकजण भक्तीभावाने करतात. आजचा दिवस तर गणेश भक्तांसाठी खूप विशेष आहे. कारण आज श्री गणेशाचा जन्मदिवस असतो (Maghi Ganesh Jayanti), असं मानलं जातं. यानिमित्ताने जर तुम्ही गणरायासाठी त्याच्या आवडीचे गूळ- खोबऱ्याचे मोदक करणार असाल तर या काही गोष्टींची काळजी घ्या (5 tips for making perfect modak). कारण मोदक तळताना फुटतात आणि कढईमध्ये त्याचं सगळं सारण पसरून तेल खराब होतं, असा अनेक जणींचा अनुभव आहे.(why do modak get burst while frying in pan?)

 

मोदक तळताना फुटू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोदकासाठी तुम्ही जे पीठ भिजवणार आहात ते अगदी घट्ट किंवा खूप सैलसर भिजवू नका. 

Maghi Ganesh Jayanti: १० मिनिटांत काढता येण्यासारख्या गणपतीच्या ८ सोप्या रांगाेळ्या, घर होईल प्रसन्न..

२. पीठ भिजवल्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा हात लावून ते ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित मळून घ्या आणि थोडा वेळ झाकून ठेवा. कारण पीठ छान मळून घेतलं तरच ते छान ताणल्या जातं आणि त्याचे चांगले मोदक होतात.

३. मोदकासाठी जेव्हा तुम्ही छोटीशी पुरी लाटता तेव्हा ती पुरी मधल्या भागात खूप जास्त पातळ लाटू नका. काठ लाटत जाऊन त्या पुरीचा आकार वाढवा.

 

४. मोदकामध्ये खूप जास्त सारण भरल्यानेही मोदक फुटतो. कारण तळताना उष्णतेमुळे त्या पदार्थांचं आकारमान वाढतं. त्यामुळे मोदकातल्या सारणाचं प्रमाण योग्य ठेवा. 

भेट म्हणून मिळालेल्या साडीचा, कलेचा ठेवला मान! वाचा निर्मला सीतारामन यांच्या साडीची खास गोष्ट..

५. मोदकासाठी जे सारण केलं जातं त्यामध्ये गूळ, खसखस, खोबरं, सुकामेवा असं सामान्यतः घातलं जातं. यातलं खोबरं आणि सुकामेवा यांचे तुकडे खूप मोठे मोठे असणार नाहीत, याची काळजी घ्या. कारण त्या तुकड्यांचा टोकदारपणा मोदकाच्या आवरणात रुततो आणि त्यामुळे मोदक फुटू शकतो. त्यामुळे खोबऱ्याचा अगदी बारीक किस करा आणि सुकामेवा मिक्सरमध्ये फिरवून थोडा बारीक करून घ्या.  

 

Web Title: Do jaggeMaghi Ganesh Jayanti: 5 tips for making perfect modak, how to make modak perfectly, why do modak get burst while frying in panry-coconut modaks burst in the pan while frying? 5 tips, every modak will be delicious-crispy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.