Lokmat Sakhi >Food > पपईसोबत अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, पोट बिघडेल, पचनाचा त्रास

पपईसोबत अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, पोट बिघडेल, पचनाचा त्रास

Do not eat papaya with these things : असे कोणते पदार्थ आहेत जे पपईसोबत खाल्ल्यास शरीराची हानी होऊ शकते पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 11:59 AM2022-06-30T11:59:07+5:302022-06-30T12:00:42+5:30

Do not eat papaya with these things : असे कोणते पदार्थ आहेत जे पपईसोबत खाल्ल्यास शरीराची हानी होऊ शकते पाहूया...

Do not eat papaya with 3 foods, stomach upset, indigestion | पपईसोबत अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, पोट बिघडेल, पचनाचा त्रास

पपईसोबत अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, पोट बिघडेल, पचनाचा त्रास

Highlightsपपई जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. पपईमध्ये असणाऱ्या पॅपिन या एन्झाईममुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते.कोणतेही विरुद्ध अन्न एकत्र खाल्ल्यास त्याचा आरोग्याला निश्चितच त्रास होतो.

फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं हे आपल्याला माहित आहे. तब्येत चांगली राहावी आणि शरीराचे उत्तम पोषण व्हावे यासाठी आपण आहारात आवर्जून फळांचा समावेश करतो. केळं, चिकू, सफरचंद आणि पपई ही बाजारात १२ महिने मिळणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी फळं. चवीला गोड असलेल्या पपईमध्ये अतिशय उत्तम गुणधर्म असल्याने त्यातून शरीराला बरेच आवश्यक घटक मिळण्यास मदत होते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर आणि प्रोटीन्स असतात. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पपई खाणे फायदेशीर ठरते. या फळात ॲण्टीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असल्याने त्वचेच्या आरोग्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो (Do not eat papaya with these things). 

पपईमध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत नाही. तसेच पपई पाण्याचा चांगला स्त्रोत असल्याने आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पपई फायदेशीर असली तरी ती खूप जास्त प्रमाणात खाणे योग्य नाही. तसेच काही ठराविक पदार्थांबरोबर पपई खाऊ नये. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. आता असे कोणते पदार्थ आहेत जे पपईसोबत खाल्ल्यास शरीराची हानी होऊ शकते पाहूया...
 

१. दही 

दही हे चवीला आंबट असते, तसेच त्यामध्ये असलेले बॅक्टेरीया फळामध्ये असलेल्या घटकांशी जुळणारे नसतात. त्यामुळे दही कोणत्याच फळासोबत खाल्लेले चांगले नाही. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी पपई खाणार असाल त्यावेळी दही खाणे आवर्जून टाळायला हवे. अन्यथा आपल्या आरोग्याला त्रास होऊ शकतो. 

२. लिंबू 

लिंबू हे आंबट वर्गात येणारे फळ आहे. पपई चवीला गोड असते. पपई आणि लिंबाचा आंबटपणा हे विरुद्ध कॉम्बिनेशन आहे. लिंबू आणि पपई चुकून एकत्र खाल्ले गेले तर शरीरात त्याचे टॉक्सिन तयार होते. यामुळे हिमोग्लोबिनच्या पातळीतही गडबड होण्याची शक्यता असल्याने या दोन्ही गोष्टी कधीच एकत्र खाऊ नयेत.

(Image : Google)
(Image : Google)

३. आंबट फळे 

टोमॅटो, किवी, संत्री, मोसंबी अशी आंबट फळे पपई खाल्ल्यानंतर अजिबात खाऊ नयेत. कारण या फळांचा आंबटपणा आणि पपईचा गोडवा यांतून तयार होणार टॉक्सिन आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. त्यामुळे पपई खायच्या आधी किंवा नंतर अशाप्रकारची आंबट फळे अजिबात खाऊ नका. 

याबरोबरच पपई जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. पपईमध्ये असणाऱ्या पॅपिन या एन्झाईममुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सूज येणे, त्वचेवर रॅशेस येणे, गरगरल्यासारखे होणे, डोकेदुखी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यांना अशाप्रकारच्या एन्झाईम्सची अॅलर्जी आहे त्यांना पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो, त्यांनी हा सल्ला पाळायला हवा... 

Web Title: Do not eat papaya with 3 foods, stomach upset, indigestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.