Lokmat Sakhi >Food > काकडी- टमाटा एकत्र खाताय? पण तसे करणे फायद्याचे असते ?

काकडी- टमाटा एकत्र खाताय? पण तसे करणे फायद्याचे असते ?

अनेक अन्न घटक आहेत जे एकत्र खाल्ल्यानं त्याचे दुष्परिणाम होतात. त्या यादीत काकडी आणि टमाटा हेदेखील आहेत. काकडी आणि टमाटा एकत्र खाणं म्हणजे विष असं समजलं जातं. ते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 07:32 PM2021-06-02T19:32:22+5:302021-06-03T15:24:30+5:30

अनेक अन्न घटक आहेत जे एकत्र खाल्ल्यानं त्याचे दुष्परिणाम होतात. त्या यादीत काकडी आणि टमाटा हेदेखील आहेत. काकडी आणि टमाटा एकत्र खाणं म्हणजे विष असं समजलं जातं. ते का?

Do you eat cucumber and tomato together? But is it worth it or wrong? | काकडी- टमाटा एकत्र खाताय? पण तसे करणे फायद्याचे असते ?

काकडी- टमाटा एकत्र खाताय? पण तसे करणे फायद्याचे असते ?

Highlightsकाकडी टमाटा एकत्र खाल्ल्यास त्याचा परिणाम पचनक्रिया बिघडण्यावर होतो.काकडी लवकर पचते तर टमाट्याच्या बिया पचनास वेळ लागतो.काकडी टमाटा एकत्र खाल्ल्यास पोटात जास्त आम्लं अथार्त अ‍ॅसिड तयार होतं.

आरोग्य जपण्यासाठी सलाड खाणं ही एक चांगली हेल्थ फॅशन आहे. आता अनेकांच्या ती अंगवळणीही पडली आहे. जेवणासोबत सलाड खाणं हे फायदेशीर मानलं जातं. जेवणासोबत सलाड खाल्ल्यानं पचन व्यवस्थित होतं, रक्ताची कमतरता दूर होते. शिवाय शरीरास आवश्यक जीवनसत्त्वं -खनिजं आणि फायबर सलाडमधून मिळतात.
सलाड म्हटलं की सर्वात आधी नंबर लागतो काकडीचा. काकडी चिरुन किंवा तिची दही घालून कोशिंबीर करुनही खातात. अनेकजण काकडीत आणखी कच्च्या भाज्या मिसळतात. जसे गाजर आणि टोमॅटो. पण आहार तज्ज्ञ म्हणतात की काकडी आणि टमाटा एकत्र खाणं ही चुकीची सवय असून त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. अनेक अन्न घटक आहेत जे एकत्र खाल्ल्यानं त्याचे दुष्परिणाम होतात. त्या यादीत काकडी आणि टमाटा हेदेखील आहेत. काकडी आणि टमाटा एकत्र खाणं म्हणजे विष असं समजलं जातं. कारण या दोन पदार्थाच्या एकत्र सेवनानं पोटात तयार होणारं आम्लं जास्त धोकादायक असतं.


काकडी टमाटा एकत्र खाल्ल्यास त्याचा परिणाम पचनक्रिया बिघडण्यावर होतो. तज्ज्ञांच्या मते यामुळे पोटात गॅस होणं, पोट फूगणं, पोटात दुखणं, मळमळणं, थकवा आणि अपचन अशा समस्या निर्माण होतात. यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे काकडी टमाटा यांचे स्वत:चे गुणधर्म. काकडी लवकर पचते तर टमाट्याच्या बिया पचनास वेळ लागतो. आणि या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्यास पोटात जास्त आम्लं अथार्त अ‍ॅसिड तयार होतं. हे अ‍ॅसिड पोटाशी निगडित अनेक समस्यांचं मूळ असतं. काकडीमधील क्यूमिन घटक पचनक्रियेदरम्यान टमाट्यातील क जीवनसत्त्वावर विपरित परिणाम घडवून आणतो. त्याचाच परिणाम म्हणजे काकडी आणि टमाटा एकत्र खाल्ल्यानं बाधतो.
अनेकजण तर कोशिंबिर करताना काकडी टमाटा आणि दही असं एकत्र करुन खातात. काकडी-टमाटा आणि दही हे तीन पदार्थ एकत्र खाणंही चुकीचं मानलं जातं.
 सलाड कधी खाता यावरही त्याचा फायदा होणार की तोटा हे अवलंबून असतं. अनेकजण जेवणाच्या आधी सलाड खातात तर काहीहण जेवणानंतर. पण तज्ज्ञ सांगतात की जेवणाआधी आणि जेवणानंतर सलाड खाणं हे दोन्हीही चुकीचं आहे. खरंतर जेवणासोबतच सलाड खावं. त्याचा फायदा अन्नाचं नीट पचन होण्यासाठी होतो. 

Web Title: Do you eat cucumber and tomato together? But is it worth it or wrong?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.