फळे खाण्याची सवय शरीरासाठी फार चांगली. शरीराला हवे असणारे अनेक गुणधर्म फळांमध्ये असतात.(Do You Know The Benefits Of Coconut?) वजन कमी करतानासुद्धा फळांचा आहार केला जातो. चविला तर फळ छानच असतात. प्रत्येक फळात वेगवेगळी जीवनसत्वे असतात. असंच एक शरीरासाठी फार पौष्टिक ठरणारं फळ म्हणजे नारळ. समुद्रकिनार्यावर असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नारळाचे उत्पादन केले जाते.(Do You Know The Benefits Of Coconut?) नारळाच्या बागा जागोजागी दिसतात. आपली आजी आमटी, भाजी तयार करताना नारळ वापरते. कारण पूर्वीच्या लोकांना नारळाचे फायदे अचूक माहिती आहेत.
सुबा सराफ म्हणते," आपण नारळाला श्रीफळ म्हणतो. इतर कोणत्याही फळाच्या आधी श्री लावले जात नाही. नारळाला पवित्र मानलं जात. प्रत्येक विधीत श्रीफळ वापरले जाते. प्रसादासाठी नारळ असतो. आपल्या पूर्वजांनी उगाचचं या नारळाचा समावेश विविध कार्यांमध्ये केलेला नाही.(Do You Know The Benefits Of Coconut?) नारळात असणार्या पोषकतत्वांसाठी प्रसाद म्हणून नारळ वापरला गेला. जेणेकरून सर्व खातील. कारण प्रसादाला कोणी नाही म्हणत नाही.
नारळात अनेक जीवनसत्वे असतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, रोगप्रतिकारक क्षमता, हृदयासाठी पोषकतत्त्वे, शरीरबांधणीसाठी व रक्तासाठी गरजेचे पदार्थ यात असतात.
ट्रायग्लिसराइड्सची मध्यम साखळी नारळात असते. जी शरीरात ताकद येण्यास मदत करते. ती पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते.
नारळात अँटिऑक्सिडंट्स असतात. जे मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असतात.शरीरातील साखर योग्य प्रमाणात ठेवण्याचे काम नारळ करते.
वजन कमी करण्यातही नारळ पाणी फायदेशीर आहे. ब्लडप्रेशर आटोक्यात राखण्यासाठी नारळ पाणी उत्तम.
विविध पदार्थ तयार करण्यासाठी नारळ वापरतात. खोबरं जेवणात, गोड पदार्थांत वापरले जाते. तसेच ओला नारळ जेवणासाठी वापरला जातो. तेल जेवणापासून केसांपर्यंत सर्वासाठीच चांगले.
प्रत्येक शुभकार्याची सुरूवात आपल्याकडे नारळानेच होते. नारळाचे नुसते फायदे जाणून घेूऊन नारळ खायला लोकं जास्त तयार झाली नसती म्हणून मग हा नारळ श्रीफळ बनला असं ही काही जणं सांगतात. पुढे प्रत्येक कार्यात नारळाला अमूल्य महत्त्व प्राप्त झालं. केसांसाठी, त्वचेसाठी नारळाचे तेल तेवढेच चांगले. रोजच्या जेवणात नारळाचा समावेश असतो. त्याचे मुख्य कारण त्याची चव नसून त्याचे शरीरासाठी असलेले फायदे आहे.