आपण नाश्त्यासाठी साऊथ इंडियन पदार्थ बरेचदा खातो. इडली सांबार खातो. तसेच मेदूवडा तर प्रचंड आवडीने खातो. अप्पम खातो. डोसाही खातो इतरही विविध पदार्थ खातो. असाच एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे दालवडा. (Do you like South Indian food for breakfast? Then this 'Anna Style Dalwada' is a must-try..)आतमध्ये मऊ आणि बाहेरुन अगदी कुरकुरीत. असा हा दालवडा छान चटणीमध्ये बुडवून खायला एकदम मस्त लागतो. पण तो कधी घरी तयार करायचा प्रयत्न आपण करत नाही कारण तो आपल्याला कठीण वाटतो. खरं तर हा दालवडा तयार करणे अगदीच सोपे आहे. (Do you like South Indian food for breakfast? Then this 'Anna Style Dalwada' is a must-try..)एखाद्या साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळतो तसाच घरी करता येतो. ही रेसिपी पाहा आणि नक्की तयार करून बघा. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो.
साहित्यचणा डाळ, पाणी, हिरवी मिरची, आलं, मीठ, तांदळाचे पीठ, कांदा, हिंग, जिरे, कोथिंबीर, तेल
कृती१. एका भांड्यामध्ये चणा डाळ घ्या. त्यामध्ये पाणी ओता आणि ती किमान २ तासासाठी तरी भिजत ठेवा. भिजून डाळ जरा मऊ होईल. मऊ झाली की एका मिक्सरमध्ये घ्या आणि जाडसर वाटा. वाटण्याआधी त्यातील थोडी डाळ बाजूला काढा.
२. नंतर वाटलेली डाळ एका पातेल्यामध्ये घ्या. त्यामध्ये बाजूला काढलेली डाळही घाला. हिरवी मिरची छान बारीक चिरुन घाला. आले किसून घाला. बारीक चिरलेला कांदा घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला. हिंग घाला. जिरे घाला. थोडं तांदळाचं पीठ घाला. पाणी वापरू नका. आपल्याला पातळ पीठ तयार करायचे नाही. वरून थोडे गरम तेल घाला आणि सगळं छान एकजीव करून घ्या.
३. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्या पीठाचे गोळे करून घ्या. कढईमध्ये तेल तापत ठेवा. तेल व्यवस्थित तापल्यावर तयार केलेले गोळे घ्या. तळणीमध्ये सोडताना ते चपट करा आणि मग तळणीमध्ये सोडा. रंग मस्त लाल-पिवळा झाला की मग वडा काढून घ्या. आवडत्या चटणीशी लाऊन मस्त मज्जा घेत खा.