Join us  

ताक म्हणजे उन्हाळ्यात अमृत, पण मीठ घालून ताकात पिताय का? कुणी टाळलेलंच बरं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 1:41 PM

Does adding salt to curd or buttermilk reduces its nutritional value? मीठ घालून ताक पिणं चांगलं की वाईट? नक्की खरं काय?

उन्हाळ्यात ताक पिण्याची मज्जाच वेगळी आहे. ताक म्हणजे अमृत असे मानले जाते. मात्र ताक पितानाही काही गोष्टी आपण समजून उमजून केल्या पाहिजे. अनेकजण ताकात आलं मिरची कोथिंबीर-ताक मसाला यासह मीठ साखर घालून पितात. पण ताकात मीठ साखर घालावे का? मुळात ताकात मीठ घालून प्यावे का आणि प्यायचे तर कुणी प्यावे कुणी न पिणे उत्तम.

खरंतर ताकामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, रिबोफ्लेविन आणि प्रोबायोटिक्स असतात. या सर्व गोष्टी ऊर्जा, निरोगी पोट, आतडे व मजबूत हाडांसाठी फायदेशीर आहे. ताकामध्ये मीठ घालून प्याल्याने त्याचे गुण कमी होतात का?

पोषणतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी सांगतात, ''ताकामध्ये आपण मीठ घालून पिऊ शकता. मीठ घालतं किंवा टाळलं तर आरोग्यावर फरक पडत नाही. पण ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी ताकात मीठ कमी किंवा टाळलं तर उत्तम ठरेल. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीराला प्रोबायोटिक्स व इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. जे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.''

यासंदर्भात, पोषणतज्ञ किरण कुकरेजा सांगतात, ''ताकामध्ये मिठाचे प्रमाण कमी असावे. मिठाचे अधिक सेवन केल्याने, त्याचा वाईट परिणाम थेट पोटावर होतो. त्यामुळे मीठाऐवजी ताकात इतर गोष्टी मिसळून प्या''(Does adding salt to curd or buttermilk reduces its nutritional value?).

ताकामध्ये असतात निरोगी बॅक्टेरिया

ताकामध्ये अनेक निरोगी जीवाणू असतात, जे आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यांना प्रोबायोटिक्स म्हणतात. पण या पेयात मीठ घातल्याने प्रोबायोटिक्सचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे मीठ प्रमाणात मिसळा.

उन्हाळ्यात जुलाब, युरिन इनफेक्शनचा तर त्रास वाढला नाही? तुमचं पाणी शुद्ध आहे का..

मिठाऐवजी ताकात काय मिसळून प्यायला हवे?

जिरे पावडर

पुदिन्याच्या कोरड्या पानांची पावडर

काळा हरभरा खाल्ल्याने डायबिटिज खरेच नियंत्रणात येतो का? तज्ज्ञ सांगतात काय खरं काय खोटं..

कोथिंबीरीची पाने

त्यामुळे घरी केलेलं, फार गार नसलेलं, गोडसर ताक उन्हाळ्यात नक्की प्या. कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा ताक पिणं कधीही उत्तम.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नसमर स्पेशल