Lokmat Sakhi >Food > ओट्स मिळमिळीत लागतं? मग बेचव का खाता, ट्राय करा ओट्सच्या 4 हेल्दी-चमचमीत रेसिपी

ओट्स मिळमिळीत लागतं? मग बेचव का खाता, ट्राय करा ओट्सच्या 4 हेल्दी-चमचमीत रेसिपी

सकाळच्या वेळी घाई झाली की कामांच्या नादात घरातील बाईचे खाणे मागे पडते. अशावेळी झटपट करता येतील आणि तरीही हेल्दी अशा ओटसच्या रेसिपी समजून घ्या...तुमच्याबरोबरच घरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच चालतील अशा या रेसिपी नक्की ट्राय करुन बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 11:50 AM2021-10-12T11:50:10+5:302021-10-12T12:12:39+5:30

सकाळच्या वेळी घाई झाली की कामांच्या नादात घरातील बाईचे खाणे मागे पडते. अशावेळी झटपट करता येतील आणि तरीही हेल्दी अशा ओटसच्या रेसिपी समजून घ्या...तुमच्याबरोबरच घरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच चालतील अशा या रेसिपी नक्की ट्राय करुन बघा

Does oats taste good? Then why not eat, try 4 healthy-spoon recipes of oats | ओट्स मिळमिळीत लागतं? मग बेचव का खाता, ट्राय करा ओट्सच्या 4 हेल्दी-चमचमीत रेसिपी

ओट्स मिळमिळीत लागतं? मग बेचव का खाता, ट्राय करा ओट्सच्या 4 हेल्दी-चमचमीत रेसिपी

Highlightsपटकन तरीही हेल्दी काहीतरी खायचं असेल तर ओट्स हा कायमच चांगला पर्याय आहे.खायलाही हेल्दी असल्यामुळे तुम्ही याचा आहारात नक्कीच समावेश करु शकतावाढलेले वजन कमी करण्यासाठीही ओटस अतिशय उपयुक्त असतात

सकाळच्या वेळी तुमची खूप धावपळ असेल आणि पटकन तरीही हेल्दी काहीतरी खायचं असेल तर ओट्स हा कायमच चांगला पर्याय आहे. सकाळची कामे, मुलांचे आवरणे, ऑफीसला जायची घाई, सगळ्यांचे डबे करणे या धावपळीत स्वत:च्या खाण्याकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. पण असे करुन चालणार नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. अशावेळी ओटस असतील तर तुम्ही त्यापासून पटकन काहीतरी करु शकता. तसेच मुलांनाही तेच ते खाऊन कंटाळा आला की हेल्दी काय द्यायचे असा यक्षप्रश्न तमाम महिलावर्गासमोर असतो. त्यासाठीही ओटसचे बरेच पदार्थ करता येतात. झटपट होणारे हे पदार्थ करायला सोपे आणि खायलाही हेल्दी असल्यामुळे तुम्ही याचा आहारात नक्कीच समावेश करु शकता. ओटसमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट दिर्घकाळ भरलेले राहते आणि त्यामुळे तुम्हाला सतत भूक लागत नाही. याचा परिणाम म्हणजे तुमचे वजन वाढलेले असेल आणि तुम्हाला ते कमी करायचे असेल तर याचा फायदा होतो. तसेचठीही ओटस फायदेशीर ठरतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असल्यास ते कमी करण्यासाब फायबरमुळे तुमची पचनक्रियाही सुधारते. ओट्स अँटीऑक्सिडंटस म्हणूनही काम करतात. तेव्हा पाहूयात ओट्सच्या काही सोप्या रेसिपी...

लोकमत
लोकमत

ओट्स स्मूदी 

ओट्समध्ये दूध, केळे घालून ते मिक्सर केल्यास त्याची स्मूदी तयार होते. ही स्मूदी बाऊलमध्ये घेऊन तुम्ही त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तो सुकामेवा घालू शकता. यामुळे हे आणखी पौष्टीक होण्यास मदत होईल. तसेच केळ्याऐवजी तुम्हाला आवडणाऱ्या वेगवेगळ्या फळांचा वापर तुम्ही यामध्ये करु शकता. तुम्हाला नारळाचे दूध आवडत असेल तर तुम्ही स्मूदीसाठी नारळाचे दूधही वापरु शकता. तुम्हाला चॉकलेट आवडत असेल तर तुम्ही यात लिक्विड चॉकलेटही घालू शकता.  

ओट्स उपमा 

आपण रव्याचा उपमा किंवा गव्हाच्या दलिया ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे ओटसचाही उपमा करता येतो. सध्या बाजारात ओटस रेडीमेड उपमाही मिळतो. पण त्यापेक्षा तुम्ही ओटस आणून घरी उपमा तयार केल्यास तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. सुरुवातीला फोडणी करावी. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मटार घालावे. हे सगळे चांगले परतून घेतल्यावर त्यात ओटस आणि अंदाजे पाणी घालावे. तिखट, मीठ आणि तुम्हाला आवडत असेल तर धने-जीरे पावडरही घालू शकता. ओटस लवकर शिजत असल्याने थोडे शिजले की गॅस बंद करावा. वरुन बारीक चिरलेली कोथिंबिर घालावी. यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही गाजर, फ्लॉवर, फरसबी, सिमला मिरची यांसारख्या भाज्याही घालू शकता. 

लोकमत
लोकमत

ओटस चिवडा 

आपण ज्याप्रमाणे पोह्याचा, मक्याचा किंवा चुरमुऱ्याचा चिवडा करतो, तसाच आपण ओटसचाही चिवडा करु शकतो. मधल्या वेळेत काय खावे किंवा मुलांना सारखे खायला काय द्यावे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हा उत्तम पर्याय आहे. १ कप पोहे, १ कप ओटस, शेंगदाणे, डाळं, कडिपत्ता, खोबऱ्याचे काप तिखट. आपण चिवड्याला ज्याप्रमाणे पोहे भाजून घेतो तसेच पोहे आणि ओटस बारीक गॅसवर भाजून घ्यावे.  चिवड्याला ज्याप्रमाणे मोहरी, जिरे, हिंग, हळदीची फोडणी करतो त्याप्रमाणे करावी. यामध्ये डाळं, शंगदाणे, कडिपत्ता, खोबऱ्याचे काप चांगले परतून घ्यावे. त्यावर ओटस आणि पोहे घालून वरुन तिखट, पिठीसाखर आणि मीठ चवीनुसार घालावे. सगळे नीट एकत्र होण्यासाठी हा चिवडा चांगला हलवावा. गार झाल्यावर हा चिवडा अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागतो. 

ओटस कटलेट 

तुमच्याकडे थोडा वेळ असेल आणि तुम्हाला ओटसपासून वेगळे काही करायचे असेल तर कटलेट हा उत्तम पर्याय आहे. ओटसमध्ये उकडलेला बटाटा, पनीर, किसलेले गाजर, बीट एकत्र करावे. यामध्ये आलं,मिरची,लसूण पेस्ट, तिखट, मीठ घालावे. तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबिर आणि इतर भाज्याही घालू शकता. याचे एकसारखे कटलेट हातावर थापावेत आणि तळावेत. तुम्हाला जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही शॅलो फ्रायही करु शकता. टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत हे कटलेट खायला अतिशय छान लागतात. मुलेही हे कटलेट आवडीने खात असल्याने पौष्टीक घटक खाल्ले जातात.  
 

Web Title: Does oats taste good? Then why not eat, try 4 healthy-spoon recipes of oats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.