नूडल्स व फ्राईड राइस अनेकांना आवडते. सध्या चायनीज खाण्याचा क्रेज लोकांमध्ये दिसून येतो. सायंकाळ झाल्यानंतर गल्लोगल्ली चायनीजचे स्टॉल दिसून येतात. चायनीजचे विविध पदार्थ आपण घरी देखील ट्राय करून पाहतो. पण फ्राईड राईस व नूडल्स करताना ते तव्यावर चिटकतात. स्टॉलवरील कढई किंवा तव्यावर राईस किंवा नूडल्स का चिटकत नाही, याचा विचार आपण कधी केला आहे का?
काहींकडे नॉन स्टिक तवा असतो, तर काहींकडे नसतो. फक्त नूडल्स व राइसच नाही तर, असे अनेक पदार्थ आहेत, जे तव्यावर चिटकतात. घरी हे पदार्थ करत असताना स्टॉलवरची चव पदार्थाला येत नाही. व हे पदार्थ करत असताना पॅनवर चिकटल्याने त्याची चव बिघडते(Does rice, noodles stick to the pan while making fried rice?).
हे पदार्थ दिसायला देखील आकर्षक दिसत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी काही ट्रिक्स सोशल मिडीयावर शेअर केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी नूडल्स व राइस तव्यावर चिटकू नये यासाठी काही टिप्स सांगितले आहे.
सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात एक भन्नाट ट्रिक
कढईत नूडल्स किंवा राइस करत असताना, सर्वप्रथम, कढई गरम करून घ्या. हाय फ्लेमवर कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घाला, तेल संपूर्ण कढईवर पसरवा, व एक्स्ट्रा तेल एका वाटीत काढून घ्या. तेल वाटीत काढून घेतल्यानंतर पुन्हा कढई गरम करण्यासाठी ठेवा. व त्यात आपल्या आवडीनुसार भाज्या व राइस घालून फ्राईड राइस किंवा नूडल्स तयार करा.
अशा प्रकारे राइस किंवा नूडल्स कढई किंवा तव्यावर चिटकणार नाही. जर ही समस्या इतर पदार्थ करताना देखील होत असेल तर, ही ट्रिक नक्की वापरून पाहा.