Join us  

चॉपिंग बोर्ड कळकट झालाय, घाण दिसतो? ही पाहा साफ करण्याची सोपी पद्धत, बोर्ड दिसेल नवीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 4:49 PM

Cleaning Chopping Board Hacks भाज्या अथवा फळे कापण्यासाठी आजकाल सगळेच जण चॉपिंग बोर्डचा वापर करतात. त्याला झटपट साफ करायचे असेल, तर एक स्टेप फॉलो करा..

किचनमधील मुख्य गोष्ट म्हणजे चॉपिंग बोर्ड. त्यातून आपण दिवसभरात कित्येक भाज्या आणि फळे चिरतो. विळी ही आता काहीशी मागे पडत चालली आहे. कारण झटपट काम आवरण्यासाठी चाकू आणि चॉपिंग बोर्ड प्रत्येकाला बरे पडते. बाजारात विविध प्रकारचे चॉपिंग बोर्ड मिळतात. ज्यात लाकडी, प्लास्टीक, मेटल यासह विविध प्रकारचे बोर्ड सहजरीत्या उपलब्ध आहे. लाकडी आणि प्लास्टीक चॉपिंग बोर्डचा अधिक वापर केला तर ते लवकर खराब होतात. बारीक चिरलेल्या भाज्या असो या फळे त्यांचे बारीक कण बोर्डवर चिकटून राहतात. जे साफ करण्यास अवघड जाते. आज आपण चॉपिंग बोर्ड साफ करण्याची झटपट आणि सोपी पद्धत सांगणार आहोत. जेणेकरून चॉपिंग बोर्ड नव्यासारखे दिसेल.

लाकडी बोर्ड साफ करण्याची पद्धत

लाकडी कटिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी, सर्वप्रथम त्यावर एक कप बेकिंग पावडर शिंपडा आणि नंतर संपूर्ण बोर्डवर एक कप व्हिनेगर पसरवा. काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर बोर्डला पूर्णपणे धुवा. याने बॉर्डवरील डाग सहज निघून जातील. 

प्लास्टीक बोर्ड साफ करण्याची पद्धत

प्लॅस्टिक बोर्ड साफ करण्यासाठी, एक चमचा ब्लीच पाण्यात मिसळा. हे मिश्रण मऊ स्पंचवर घ्या आणि बोर्ड चांगले स्वच्छ करा. शेवटी कटिंग बोर्ड गरम पाण्याने धुवा. 

बांबू कटिंग बोर्ड साफ करण्याची पद्धत

बांबू कटिंग बोर्ड साफ करण्यासाठी, डिश साबण, किंवा भांडी घासण्याचा साबण घ्या. त्यात कोमट पाणी टाका. मऊ स्पंजने पूर्णपणे बोर्ड घासून घ्या. आणि चांगले धुवून घ्या. बोर्ड धुतल्यानंतर टॉवेलने चांगले स्वच्छ करा.

टॅग्स :किचन टिप्सलाइफस्टाइलअन्न