Join us  

पदार्थाला जळका वास येतोय? ४ टिप्स, जळका वास जाईल पदार्थ लागेल चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2022 1:17 PM

Food Smell Burnt Home Remedy पदार्थ खाली लागला की वास येतो, पदार्थ फेकून न देता करा झटपट उपाय

आपण जेव्हा एखादा पदार्थ मन लावून बनवत असतो, तेव्हा काही निष्काळजीपणामुळे तो पदार्थ भांड्याच्या तळाशी चिकटला जातो, आणि काही प्रमाणात जळून जातो. तेव्हा आपला मुड आणि जेवण दोन्ही देखील बिघडून जाते. तो पदार्थ बनवण्यात घेतलेली विशिष्ट मेहनत आणि वेळ वाया जातो. पदार्थ पूर्णपणे जळले तर त्यातून जळका वास येऊ लागतो, मात्र, कधी कधी त्या पदार्थामधून जळका वास येतो तर कधी कधी येत नाही. अशा परिस्थितीत स्वयंपाकघराशी संबंधित हे काही सोपे हॅक आपली समस्या दूर करू शकतात. कसे ते जाणून घेऊया. 

जळालेला भाग फेकून द्या

जर तुम्ही कोणता तरी पदार्थ बनवत असाल आणि ते जळले असेल तर, जळालेला भाग फेकून देणे हा उत्तम मार्ग आहे. हे संपूर्ण डिश वाया जाण्यापासून वाचवेल आणि तुमचे अन्न देखील खाण्यायोग्य होईल.

जळालेले पॅन बदला

ज्या पॅन किंवा इतर भांड्यामध्ये तुमचे अन्न जर जळले असेल, तर ते तुम्ही बदलून घ्या. तुम्ही वरून अन्न बाहेर काढा आणि दुसऱ्या पॅनमध्ये काढून ठेवा. यामुळे जळलेली जागा तळाशी राहील आणि दुर्गंधी बर्‍याच प्रमाणात निघून जाईल.

बटाटे घाला

जळालेल्या पदार्थात जर तुम्ही बटाटा घालाल तर त्यातला जळालेला वास कमी होईल. बहुतांशवेळा पदार्थांमध्ये मीठ जास्त पडल्यास आणि जळालेला वास कमी करण्यास बटाटा उपयुक्त ठरतो. यासाठी बटाटे कापून ताटात थोडा वेळ ठेवावे. मग बटाट्याला जळालेल्या अन्नाचा वास येईल.

लिंबूसह एडजेस्ट करा

जळालेल्या पदार्थाचा वास बाहेर काढण्यासाठी लिंबू खूप प्रभावी आहे. लिंबुमध्ये अनेक गुणधर्म आहेत. जे तुमच्या जेवणाला विशिष्ट चव देते. जर जळालेल्या अन्नाचा वास कमी करायचा असेल तर तुम्ही जेवणात लिंबूही पिळून घेऊ शकता. यामुळे जळालेल्या पदार्थाचा वास बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

टॅग्स :किचन टिप्सहोम रेमेडी