Lokmat Sakhi >Food > काय सांगता? ८५ हजार रूपयांना मिळत १ किलो पनीर; असं आहे तरी काय या पनीरमध्ये?

काय सांगता? ८५ हजार रूपयांना मिळत १ किलो पनीर; असं आहे तरी काय या पनीरमध्ये?

Donkeys Milk Cheese Is More Expensive : सामान्यतः आपल्या देशात पनीरची किंमत 300 ते 600 रुपये प्रति किलो आहे. हे पनीर बनवण्यासाठी बहुतेक गाईचे किंवा म्हशीचे दूध वापरले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 03:29 PM2022-06-23T15:29:34+5:302022-06-23T16:41:02+5:30

Donkeys Milk Cheese Is More Expensive : सामान्यतः आपल्या देशात पनीरची किंमत 300 ते 600 रुपये प्रति किलो आहे. हे पनीर बनवण्यासाठी बहुतेक गाईचे किंवा म्हशीचे दूध वापरले जाते.

Donkeys Milk Cheese Is More Expensive : Donkeys milk cheese is more expensive than 85 thousand know the reason | काय सांगता? ८५ हजार रूपयांना मिळत १ किलो पनीर; असं आहे तरी काय या पनीरमध्ये?

काय सांगता? ८५ हजार रूपयांना मिळत १ किलो पनीर; असं आहे तरी काय या पनीरमध्ये?

तुम्ही दैनंदिन वापरासाठी दूध खरेदी करत असाल, ज्याची किंमत प्रति लिटर 50 ते ६० रुपये आहे. दुधापासून बनवलेल्या पनीरची किंमत सुमारे 300 ते 600 रुपये प्रतिकिलो आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, पनीरची किंमत 85 हजार प्रति किलोपेक्षा जास्त असू शकते? वास्तविक, असा एक देश आहे जिथे गाढवाच्या दुधापासून बनवलेले पनीर 87 हजार रुपये किलोने विकले जाते. जाणून घेऊया की गाढवाच्या दुधापासून बनवलेले पनीर इतके महाग का आहे. (Donkeys milk cheese is more expensive than 85 thousand know the reason)

सामान्यतः आपल्या देशात पनीरची किंमत 300 ते 600 रुपये प्रति किलो आहे. हे पनीर बनवण्यासाठी बहुतेक गाईचे किंवा म्हशीचे दूध वापरले जाते. त्याच वेळी, दक्षिण-पूर्व युरोप, सर्बिया या देशात पनीरची किंमत प्रति किलो 11 हजार डॉलर्स आहे. म्हणजेच आपल्या भारत देशाच्या चलनानुसार ही किंमत ८७ हजारांहून अधिक आहे. वास्तविक हे चीज गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापासून बनवले जात नाही, तर हे पनीर गाढवाच्या दुधापासून बनवले जाते.  गाढवाच्या दुधापासून बनवलेलं पनीर इतके महाग का विकले जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे पनीर इतकं महाग का आहे?

गाढवाच्या दुधापासून पनीर बनवणे सोपे काम नाही, कारण त्यात पुरेसे लैक्टोज नसते, त्यामुळे गाढवाचे दूध लवकर खराब होते. अशा परिस्थितीत त्याचे पनीर बनवणे खूप कठीण काम आहे. यामुळेच  गाढवाच्या दुधापासून बनवलेल्या चीजची किंमत खूप जास्त आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे येथे एवढे महागडे पनीर विकूनही ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रांग लागते.

भयंकर! रूट कॅनल नंतर बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; खरंच ही ट्रिटमेंट इतकी धोकादायक असते?

एक किलो पनीरसाठी २५ लिटर दुधाची आवश्यकता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसविका स्पेशल नेचर रिझर्व्ह सर्बियामध्ये आहे. या ठिकाणी गाढवाच्या दुधापासून पनीर बनवले जाते. 1 किलो पनीरसाठी 25 लिटर दूध लागते आणि ते बनवण्याचे तंत्रही खूप अवघड आहे. यामुळेच त्याची किंमत लाखोंपर्यंत पोहोचते.

या पनीरची खासियत

तज्ज्ञांच्या मते गाढवाच्या दुधात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. प्रथम, गाढवाचे दूध हे आईच्या दुधासारखे असते. त्यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-एजिंग आणि रिजनरेटिंग कंपाऊंड्स असतात. त्वचेसाठीही ते खूप फायदेशीर आहे.  हेच कारण आहे की त्याचे दूध क्रीम, मॉइश्चरायझर आणि साबण इत्यादी बनवण्यासाठी वापरले जाते. अनेक ठिकाणी गाढवाच्या दुधापासून बनवलेल्या ब्युटी प्रोडक्टची मागणी जास्त आहे. दमा आणि ब्राँकायटिसच्या रुग्णांसाठी त्याचे दूध किंवा चीज देखील खूप फायदेशीर आहे.

Web Title: Donkeys Milk Cheese Is More Expensive : Donkeys milk cheese is more expensive than 85 thousand know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.