Lokmat Sakhi >Food > आधीच लसूण महाग, त्यात चांगल्या क्वालिटीचा कोणता, हे कसं ओळखाल? शेफ पंकज सांगतात युक्ती...

आधीच लसूण महाग, त्यात चांगल्या क्वालिटीचा कोणता, हे कसं ओळखाल? शेफ पंकज सांगतात युक्ती...

Don't Buy Garlic that Smells like Garlic : Why You Should Avoid Buying Garlic That Smells Like Garlic : MasterChef Pankaj Bhadouria Share Tips To Buy Fresh Garlic : लसूण खराब न होता दीर्घकाळ टिकावा यासाठी मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात एक खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2025 16:59 IST2025-01-01T16:56:07+5:302025-01-01T16:59:41+5:30

Don't Buy Garlic that Smells like Garlic : Why You Should Avoid Buying Garlic That Smells Like Garlic : MasterChef Pankaj Bhadouria Share Tips To Buy Fresh Garlic : लसूण खराब न होता दीर्घकाळ टिकावा यासाठी मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात एक खास उपाय...

Don't Buy Garlic that Smells like Garlic Why You Should Avoid Buying Garlic That Smells Like Garlic MasterChef Pankaj Bhadouria Share Tips To Buy Fresh Garlic | आधीच लसूण महाग, त्यात चांगल्या क्वालिटीचा कोणता, हे कसं ओळखाल? शेफ पंकज सांगतात युक्ती...

आधीच लसूण महाग, त्यात चांगल्या क्वालिटीचा कोणता, हे कसं ओळखाल? शेफ पंकज सांगतात युक्ती...

'लसूण' हा आपल्या भारतीय पदार्थांमधील सगळ्यात महत्वाचा पदार्थ. भाजी, आमटी, डाळ यांना फोडणी देण्यासाठी आवर्जून लसूण वापरला जातो. फोडणीमध्ये लसूण घालताच कोणत्याही पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. आपण शक्यतो एकदाच लसूण आणून तो व्यवस्थित स्टोअर करुन ठेवून देतो, मग जसा लागेल तसा लसूण (Don't Buy Garlic that Smells like Garlic) वापरतो. 'लसूण' हा आपल्या रोजच्या स्वयंपाकात लागणारा (Why You Should Avoid Buying Garlic That Smells Like Garlic) महत्वाचा पदार्थ आहे. यासाठी लसूण आपण फार मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ठेवतो. लसूण खरेदी करताना आपण चांगल्या लसणाची निवड करुनच मग लसूण विकत घेतो. लसूण ओला नसून सुकाच असला पाहिजे(MasterChef Pankaj Bhadouria Share Tips To Buy Fresh Garlic).

लहान नाजूक पाकळ्यांचा लसूण याचबरोबर लसूण खरेदी करताना त्याचा येणारा जरासा उग्र आणि तिखट गंध अशा काही बेसिक गोष्टी तपासूनच आपण लसूण विकत घेतो. परंतु सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात की, चांगल्या लसणाची निवड करताना जर त्यांना लसणाचा गंध येत असेल तर असे लसूण खरेदी करु नका. मास्टरशेफ पंकज भदौरिया लसूण खरेदी करताना लसणाचा गंध येणाऱ्या लसणांची निवड करु नका असे का सांगतात, ते पाहूयात. 

लसणाला जर लसणाचा वास येत असेल तर असे लसूण घेणं टाळा कारण... 

आपण सगळ्याच गृहिणी लसूण खरेदी करताना शक्यतो, त्याचा वास तपासून जर लसणाला एक प्रकारचा विशिष्ट हलकासा उग्र - तिखट गंध येत असेल तर तो लगेच आपण विकत घेतो, परंतु हे संपूर्णपणे चुकीचे आहे. सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया यांच्या सांगण्यानुसार, जर लसणाला लसणाचाच हलकासा उग्र - तिखट गंध येत असेल तर तो लसूण पुढच्या काही दिवसांत खराब होणारा असतो, यासाठीच असा लसूण विकत घेणे शक्यतो टाळावेच. जर लसणाचा तीव्र, तिखट,उग्र वास येत असेल तर ते खराब झालेले किंवा होणार आहेत असे समजावे. लसणाला असा वास येणे म्हणजेच लसूण खराब होण्याच्या सुरुवातीच्या  सर्वात महत्वांच्या लक्षणांपैकी एक आहे. त्याचवेळी, लसूण जुना झाल्यावर त्यात हिरवे कोंबही वाढू लागतात. असा लसूण चवीला कडू लागतो आणि खाण्यास देखील चांगला नाही. याव्यतिरिक्त, खराब झालेला लसूण चिकट - पचपचीत होऊ शकतो. याचबरोबर ओलाव्यामुळे तो कुजला असून खाण्यास योग्य ठरत नाही. यामुळेच लसणाला जर लसणाचाच वास येत असेल तर असे लसूण अजिबात खरेदी करू नका अशा लसणाची चव आधीच कमी झालेली असते याशिवाय  जर तुम्ही ते विकत घेतले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही.

तोंडी लावण्यासाठी करा हिवाळा स्पेशल हिरव्यागार ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा, घ्या झणझणीत झटपट रेसिपी...


वर्षभर टिकणारं ताज्या आवळ्याचं घरच्याघरीच करा चटपटीत लोणचं, चटकदार लोणच्याची खास रेसिपी...

असा लसूण आरोग्यासाठी चांगला नसतो, यामुळे पदार्थांची चवही बदलते. कारण त्याची  नैसर्गिक चव बदलली जाते आणि फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर ते खराब होऊ लागतात. त्यात जास्त आर्द्रता असते आणि लसूण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यातील आर्द्रता वाढू शकते, ज्यामुळे त्यावर बुरशी किंवा बॅक्टेरियाची वाढ होते.

ग्रेव्हीला रेस्टॉरंटसारखा घट्ट- दाटसरपणा येत नाही ? ७ टिप्स, ग्रेव्ही होईल परफेक्ट आणि चविष्ट...

योग्य लसूण कसा निवडायचा ?

१. लसूण पाकळ्यांवर काळे, तपकिरी किंवा हिरवे डाग दिसल्यास असे लसूण विकत घेऊ नका. 
२. पॅकिंग केलेला लसूण खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट आणि पॅकेट तपासा.
३. लसूण जर ओला असेल तर विकत घेऊ नका, नेहमी सुका लसूण विकत घ्यावा. 

लसूण कसा स्टोअर करून ठेवावा ? 

लसूण चुकीच्या पद्धतीने साठवल्यास ते लवकर खराब होऊ शकते आणि त्याची चवही बदलू शकते. त्यामुळे ते व्यवस्थित स्टोअर करणे गरजेचे असते.  यासाठी लसूण संपूर्णपणे सोलून स्टोअर करु नका. लसूण नेहमी थंड, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. लसूण प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवू नका , कारण त्यात ओलावा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे लसूण लवकर कुजतो. त्याच वेळी, तुम्ही सोललेल्या लसणाच्या पाकळ्या एका लहान एअर टाईट  कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता.

Web Title: Don't Buy Garlic that Smells like Garlic Why You Should Avoid Buying Garlic That Smells Like Garlic MasterChef Pankaj Bhadouria Share Tips To Buy Fresh Garlic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.