Lokmat Sakhi >Food > साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र- रवाळ...

साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र- रवाळ...

Kitchen Hacks : How To Store Your Malai To Preserve It For A Long Time : साय आपण साठवतो पण ती खराब झाली तर कष्ट वाया, म्हणून हे खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 07:35 PM2023-07-10T19:35:22+5:302023-07-10T19:49:43+5:30

Kitchen Hacks : How To Store Your Malai To Preserve It For A Long Time : साय आपण साठवतो पण ती खराब झाली तर कष्ट वाया, म्हणून हे खास उपाय

Don't Let Your Malai Go Bad, Store It Like A Pro With These Simple Techniques. | साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र- रवाळ...

साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र- रवाळ...

आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात तेल - तुपाचे महत्त्व मोठे. अनेक घरांमध्ये तर बाहेरचे तूप विकत न आणता घरीच साजूक तूप बनवले जाते. 
घरीच साजूक तूप बनवायचं म्हटलं तर त्याची प्रक्रिया ही खूपच लांबलचक. किमान ८ ते १० दिवस दुधावर येणारी साय एका वेगळ्या भांड्यात साठवून ठेवायची. ही साय फ्रिजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवली जाते. मग विरजण लावायचं. काहीवेळा फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवली तर साय खराब होण्याची शक्यता असते. एक प्रकारची दुर्गंधी येऊ लागते. म्हणूनच तूप बनवताना साठवली जाणारी साय योग्य पद्धतीने स्टोअर करून ठेवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स(Don't Let Your Malai Go Bad, Store It Like A Pro With These Simple Techniques).

हे अजिबात विसरु नका.

१. साठवलेली साय फ्रिजरमध्ये स्टोअर करून ठेवा :- आपल्यापैकी बरेचजण तूप बनवण्यासाठीही साय साठवून ठेवतात. ही साय एका स्वच्छ, ओलावा नसलेल्या भांड्यात साठवून ठेवावी. साठवून ठेवलेली साय खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये न ठेवता फ्रिजरमध्ये स्टोअर करून ठेवावी. ही साय फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवल्याने काही काळानंतर त्यावर बुरशी येऊन त्याला खराब दुर्गंधी येऊ लागते. असे होऊ नये म्हणून ही साय फ्रिजरमध्ये साठवून ठेवावी. जेणेकरून ती बराच काळ खराब न होता नीट टिकून राहील. 

पावसाळ्यात मीठ व साखरेला ओलसरपणा येऊन गुठळ्या तयार होतात ? ६ सोप्या घरगुती टिप्स...

२. योग्य डब्याचा वापर करावा :- ही साय साठवून ठेवताना प्रामुख्याने स्टील किंवा चिनीमाती तसेच काचेच्या भांड्याचा वापर करु शकता. प्लास्टिक, फायबर किंवा इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात साय कधीही साठवू नका. साय बऱ्याच काळासाठी ताजी ठेवण्यासाठी ती स्टील, चिनीमाती किंवा काचेच्या कंटेनरमध्ये साठवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. स्टीलच्या भांड्यात साय झाकून फ्रिजरमध्ये ठेवल्यास, साय सुमारे महिनाभर पूर्णपणे फ्रेश राहते. अशा प्रकारे त्यामध्ये बुरशीची वाढ होत नाही आणि दुर्गंधीही येत नाही.

३. झाकून ठेवा आणि साठवा :- तूप बनवण्यासाठी साय साठवताना, बहुतेक लोक त्याचे भांडे उघडेच ठेवतात. असे न करता साय भांड्यात ठेवल्यानंतर वरून झाकण ठेवून सायीचे भांडे झाकणे आवश्यक आहे. अशा प्रकारे त्याचा वास फ्रिजर किंवा फ्रिजमध्ये पसरत नाही. तसेच, साठवून ठेवलेली साय कोरडी न पडता बऱ्याच काळासाठी ताजी राहते. 

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...

४. फ्रिज डिफ्रॉस्ट करू नका :- बर्‍याचवेळा आपण साय फ्रिजरमध्ये ठेवायला विसरतो आणि बर्फ काढण्यासाठी रात्रभर फ्रिज डिफ्रॉस्ट करतो. त्यामुळे जोपर्यंत साय फ्रिजरमध्ये ठेवलेली आहे तोपर्यंत फ्रिज अजिबात डिफ्रॉस्ट करू नये, यामुळे साय खराब होऊ शकते. 

५. अधिक तूप काढण्याची पद्धत :- जर आपल्याला सायीमधून जास्त प्रमाणात तूप काढायचे असेल तर आपण साय साठवताना त्यात एक चमचा दही मिसळू शकता. त्यामुळे सायीची चवही खराब होत नाही व ती दीर्घकाळ टिकते.

सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...

Web Title: Don't Let Your Malai Go Bad, Store It Like A Pro With These Simple Techniques.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न