Join us  

भाज्या शिजवायच्या म्हणून शिजवू नका, भाज्यांचं तंत्र आणि उत्तम चवीचं गुपित जाणून घ्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 7:06 PM

बऱ्याचदा स्वयंपाक पटापट उरकायचा असतो. त्यामुळे मग भराभर फोडणी घालून भाज्या केल्या जातात. पण असं करू नका. कारण.......

ठळक मुद्देअगदी कमी पाण्यात भाज्या शिजवाव्या. तसेच भाज्या शिजवलेले पाणी भाजीतच वापरून टाकावे.

स्वयंपाक ही एक कला आहे आणि ती शिकता शिकताच येत असते, असं म्हणतात, ते काही खोटं नाही. कारण जोपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रयोगातून शिकत नाही, किंवा कुणाचं तरी व्यवस्थित पाहून पदार्थ बनवत नाही, तोवर तो कसा बनेल याची काही गॅरंटी नाही. भाज्या फोडणीला टाकून शिजवल्या आणि त्यात तिखट, मीठ, मसाला घातला की भाजी चवदार होतेच याचा काही नेम नसतो. कारण या गोष्टी जरी भाज्यांना स्वादिष्ट बनविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्या तरी तुम्ही भाजी कशी चिरता, कशी शिजवता किंवा तिला फोडणी कशी घालता, यासारख्या अनेक गोष्टींवर भाज्यांची चव अवलंबून असते. 

 

एवढेच नाही तर तुम्ही भाज्या किती आणि कशा शिजवता, भाज्या शिजवताना किती आणि कसं पाणी घालता, यासारख्या अनेक गोष्टींवरही भाज्यांची चव अवलंबून असते. केवळ चांगली चव यावी म्हणूनच नव्हे, तर भाज्यांमधले पौष्टिक घटक तसेच रहावेत, खूप जास्त शिजवल्यामुळे भाज्यांमधील गुणधर्म कमी होऊ नयेत, यासाठी देखील भाज्या शिजवताना काळजी घेणे गरजेचे आहे. 

 

१. कारलेकारले कधीही शिजवून घेऊ नका. कारल्याची भाजी नेहमी परतूनच करावी. कारली शिजवली तर त्याच्यातले पौष्टिक घटक कमी होत जातात. त्यामुळे मग अशी भाजी खाल्ली आणि नाही खाल्ली तरी शरीराला कोणताच फायदा होत नाही. म्हणूनच कारल्याची भाजी नेहमी तेल टाकून परतून घ्यावी. कारल्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी ती शिजवू नये.

२. पालेभाज्यापालक, चूका अशा पालेभाज्या करताना अनेक जण त्या शिजवून घेतात. या भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्या पण शिजवण्यासाठी खूप जास्त पाणी त्यात टाकू नका. अगदी कमी पाण्यात या भाज्या शिजवाव्या. तसेच भाज्या शिजवलेले पाणी भाजीतच वापरून टाकावे.

 

३. शेवगाशेवगा शिजवण्यासाठी अनेक जण पातेल्याचा किंवा कुकरचा वापर करतात. पण शेवगा जर कुकरमध्ये शिजवला तर तो खूप जास्त शिजतो आणि त्यातील पौष्टिक घटक कमी होत जातात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगा उकडायच्या असतील तर पातेल्यात पाणी टाकून त्यात त्या उकडा. पाणी उकळत असताना त्यावर झाकण ठेवा. शेवगा शिजून उरलेले पाणी भाज्यांमध्ये किंवा वरणामध्ये टाका. शेवगा शिजवत असतानाच पाण्यात थोडे मीठ टाका. 

 

४. टोमॅटो व इतर भाज्याटोमॅटो, सिमला मिरची, काशीफळ या भाज्या अतिशय कमी वाफेवर शिजतात. या भाज्या शिजवताना पाणी टाकू नये. तसेच मोठा गॅस करूनही या भाज्या शिजवू नये.   

टॅग्स :अन्नपाककृती