उन्हाळा सुरू झाला आहे. आता मस्त फळं खायची. त्यांचा रस काढून गार करून मिटक्या मारत प्यायचा. फळांना सालं तर असतातच. काही आपण खातो. (Don't throw away watermelon rinds, make this delicious recipe )तसेच अनेक फळांची साले आपण काढून घेतो. संत्र्यासारख्या फळांची सालं आपण वाळवून त्वचेसाठी वापरतो. (Don't throw away watermelon rinds, make this delicious recipe )पण एक असं फळ आहे, ज्याच्या सालाची भाजी तयार केली जाते. ते फळ म्हणजे कलिंगड.
मस्त गोड असे कलिंगड खाऊन झाले की, उरलेला पांढरा भाग आपण टाकून देतो. पण त्या सालांपासून मस्त चमचमीत अशी भाजी तयार करता येते. चवीलाही फारच छान लागते. कलिंगडाची साले पौष्टिक असते. (Don't throw away watermelon rinds, make this delicious recipe )त्यामुळे ती फेकण्यापेक्षा खाण्यासाठी वापरणे कधीही चांगले.
साहित्य:
कडीपत्ता, जिरं, मोहरी, कांदा, हिरवी मिरची, मीठ, तेल, काश्मीरी लाल मिरची, लाल तिखट, धने-जिरे पूड, हळद, कलिंगड, दाण्याचं कुट, आलं-लसूण- सुखं खोबरं वाटण, पाणी
कृती:
१. कलिंगडाच्या सालाचा हिरवा भाग कापून टाकायचा. आपल्याला फक्त पांढरा भागच वापरायचा आहे. पांढर्या भागाचे मध्यम तुकडे करून घ्यायचे. ते तुकडे व्यवस्थित धुऊन घ्या. लालसर भागही काढलात तरी चालेल.
२. एका कढईमध्ये आता फोडणी तयार करायची. त्यासाठी थोडे तेल घ्यायचे, त्या तेलामध्ये जिरं व मोहरी घालून तडतडू द्यायची. नंतर कडीपत्ता घालायचा. त्यामध्ये काश्मीरी मिरची आणि हिरवी मिरची चिरून घालायची. सगळं छान परतून घ्यायचे. आलं-लसूण- सुखं खोबरं असं वाटण तयार करून त्यात घालायचे.
३. आता त्यामध्ये चिरलेली साले घालायची. ढवळून घ्यायचे. जरा वेळ झाकून ठेवा. मग त्यामध्ये लाल तिखट, धने-जिरे पूड, हळद घालून घ्या. थोडं पाणी घाला आणि ते ढवळून घ्या. जरा वेळ झाकून ठेवा. सालं शिजेपर्यंत वाफवून घ्या.
४. चवीनुसार मीठ घाला. दाण्याचं कुट घाला. सगळं छान एकजीव करून घ्या. आणि मग पोळीशी लाऊन खा.