कोणताही स्नॅक्सचा पदार्थ करायचा म्हटला की त्यात ब्रेड हा आलाच. बहुतेक स्नॅक्सच्या पदार्थांमध्ये ब्रेडचा वापर केला जातो. ब्रेड रोल, सँडविच, ब्रेड पकोडा अशा अनेक पदार्थांमध्ये ब्रेडचा वापर केला जातो. ब्रेडचा वापर करुन अनेक पदार्थ बनवताना काहीवेळा आपण या ब्रेडच्या कडा काढून फक्त ब्रेडच्या मधला सॉफ्ट स्लाइस वापरतो(Don't Waste Leftover Bread Sides-Make This Easy And Delicious Recipe).
शक्यतो सँडविच, ब्रेड रोल असे स्नॅक बनवताना आपण ब्रेडच्या कडा (How to use leftover bread slices corner) कापून घेतो. या ब्रेडच्या कापलेल्या कडांच्या काही उपयोग होणार नाही असा विचार करून आपण या कडा फेकून देतो. परंतु या कडा न फेकता आपण यापासून अनेक टेस्टी डिशेज तयार करु शकतो. या इवल्याशा छोट्या ब्रेडच्या कडांपासून आपण गोड, तिखट अशा अनेक चवींचे पदार्थ बनवू शकतो. या ब्रेडच्या कडा न फेकता त्यापासून नेमके कोणकोणते पदार्थ तयार करता येतात ते पाहूयात( 4 Things You Can Make From Bread Sides/Corners).
ब्रेडच्या कडा न फेकता त्यापासून कोणते टेस्टी पदार्थ करु शकतो ?
१. क्रिस्पी स्नॅक्स :- सगळ्यात आधी ब्रेडच्या उरलेल्या कडा गरम तव्यावर ठेवून चांगल्या खरपूस भाजून घ्या. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यावर थोडे बटर देखील घालू शकता. यानंतर त्यावर चाट मसाला, लाल तिखट आणि थोडे जिरे आणि काळी मिरी पावडर भुरभुरवा. त्यानंतर या ब्रेडच्या कडा ५ मिनिटांसाठी तव्यावर तशाच ठेवून द्याव्यात. या ब्रेडच्या कडा पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तव्यावर चांगल्या भाजून घ्याव्यात. मग या कडा एका ताटात काढून केचपसोबत खाऊ शकता.
२. डाळीसोबत रोस्टेड ब्रेड :- सर्वात आधी घट्ट डाळ तयार करुन घ्यावी. त्यानंतर ब्रेडच्या उरलेल्या कडा तव्यावर तेल घालून हलक्याच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घ्याव्यात. ब्रेडच्या उरलेल्या कडांना थोडासा क्रिस्पीनेस येईपर्यंत त्या तव्यावर गरमागरम खरपूस भाजून घ्याव्यात. आता या भाजून घेतलेल्या ब्रेडच्या कडा एका बाऊलमध्ये घेऊन त्यावर डाळ ओतावी. या गरमागरम घट्ट डाळीसोबत भाजून घेतलेल्या कुरकुरीत ब्रेडच्या कडा खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.
पराठा एक चव अनेक ! 'फोर इन वन' पराठ्याची व्हायरल रेसिपी, करायला सोपा चवीला टेस्टी...
३. ब्रेड मिठाई :- ब्रेडच्या उरलेल्या कडांपासून आपण होममेड ब्रेड मिठाई तयार करु शकतो. ब्रेडच्या कडांपासून मिठाई तयार करण्यासाठी आपल्याला ब्रेडच्या कडा, दूध, वेलची पूड, साखर, ड्रायफ्रुटस, बटर असे साहित्य लागेल. आता सर्वात आधी बटर लावून ब्रेडच्या कडा तव्यावर खरपूस भाजून घ्याव्यात. त्यानंतर दुधात साखर आणि वेलची पूड घालून हे दूध गॅसच्या मंद आचेवर ठेवून थोडे घट्टसर होईपर्यंत उकळवून घ्यावे. आता या ब्रेडच्या खरपूस भाजून घेतलेल्या कडा एका डिशमध्ये घेऊन त्यावरुन हे घट्टसर दूध ओतून घ्यावे. त्यावरुन ड्रायफ्रुटसचे काप हलकेच भुरभुरवून घालावेत. अशाप्रकारे आपण ब्रेडच्या उरलेल्या कडांपासून अतिशय झटपट होणारी स्वीट डिश बनवू शकतो. जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा आपण ही स्वीट डिश खाऊ शकता.
४. ब्रेड क्रम्ब्स :- उरलेल्या ब्रेडच्या कडांपासून आपण ब्रेड क्रम्ब्स देखील बनवू शकतो. या उरलेल्या ब्रेडच्या कडा एकदम हलक्या गरम तव्यावर कोरड्या भाजून घ्याव्यात. त्यानंतर या भाजलेल्या ब्रेडच्या कडा मिक्सरला लावून त्याची पावडर बनवून ब्रेड क्रम्ब्स तयार करावेत. हे ब्रेड क्रम्ब्स एका काचेच्या हवाबंद बरणीत स्टोअर करुन ठेवावेत. वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स बनवताना त्यात हे ब्रेड क्रम्ब्स घालून पदार्थ बाइंडिंग होण्यासाठी वापरु शकतो.
उपवासाचे फराळाचे पदार्थ करण्यासाठी कोणतं तेल वापरावं? शेफ रणवीर ब्रार सांगतात ' हे ' तेल बेस्ट...