कुरकुरीत खमंग डोसा, प्रत्येकाच्या आवडीचा. लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला डोसा आवडतो. हेल्दी ब्रेकफास्ट म्हटलं डोश्याला पसंती दाखवली जाते. सध्या डोश्यामध्ये देखील अनेक प्रयोग केले जातात. डाळ-तांदुळाचा डोसा (Dosa) आपण नेहमी खातोच. याशिवाय रवा डोसा, मसाला डोसा, मैसूर डोसा देखील तितकेच फेमस आहे. मात्र, डोसा घरी तयार करताना अनेकदा एक चूक हमखास होते. ती म्हणजे डोसा तव्याला चिकटणे.
अनेकदा बॅटरमुळे डोसा तव्याला चिकटतो. ज्यामुळे डोसा उलथताना फाटतो, किंवा तव्याला चिकटला जातो. डोसा जर तव्याला चिकटला तर तो लवकर निघत नाही. ज्यामुळे अनेक गृहिणींचा डोसा करताना हिरमोड होतो. डोसा तव्याला चिकटल्यावर काय करावे? न तुटता डोसा तव्यातून काढायचा कसा? (Cooking Tips) यासाठी एक सोपी ट्रिक आपल्याला नक्कीच मदत करेल(Dosa always sticks to pan, try out this hatke trick).
डाळीत किडे झाले? ३ सोप्या ट्रिक्स, डाळ निवडून स्वच्छ होईल एकदम झटपट
डोसा चिकटल्यावर उपाय
१. अनकेदा पीठ भिजवताना काही गडबड झाली, किंवा प्रमाण चुकले तर, डोसा तव्याला चिकटतो. डोसा परफेक्ट तयार होत नाही. या करणामुळेही डोसा तव्याला चिकटतो. अनेकदा पीठ तयार असते. पण तव्यामुळे डोसे जमत नाहीत. अशा वेळी डोसे तुटतात. किंवा तव्याला चिकटून राहतात. अशा वेळी तवा नेहमी स्वच्छ धुवून वापरावा.
२. तवा तापल्यावरच त्यावर डोश्याचे पीठ पसरवावे. यासाठी तवा तापवून घ्या. त्यावर थोडे पाणी शिंपडा, नंतर तेल पसरवा. तवा गरम असतानाच त्यावर डोश्याचं पीठ पसरवा. त्यानंतर सगळ्या बाजूने एक टेबलस्पून तेल सोडा, व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे डोसा तयार केल्यास, डोसे कुरकुरीत तयार होतील.
३. डोसा जर तव्यावर चिकटला असेल, किंवा तव्यावरून निघत नसेल तर, उलातनं पाण्यात बुडवा, व हलक्या हाताने डोसा तव्यावरून अलगद उचलून पलटी करा. उलातनं पाण्यात बुडवल्याने, डोसा तव्यावरून सहज निघेल.