थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. या दिवसांत बाजारांत फळं, भाज्यांसोबतच टपोरे आवळे विकण्यासाठी ठेवलेले पहायला मिळतात. आंबट -तुरट, गोड चवीचा हा आवळा बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत. आवळा म्हटलं की आवळ्याचा मुरंबा, आवळ्याचं लोणचं, आवळा कँडी (Awala Candy recipe) अशा वेगवेगळ्या पदार्थांची आठवण येऊ लागते. आवळा हा आरोग्याच्या अनेक समस्यांवरील उत्तम औषध आहे हे आपल्याला माहित आहे. मात्र तरीही आपल्याकडून म्हणावा तितका हा पदार्थ नियमित खाल्ला जात नाही (Dried Amla Candy)
आयुर्वेदामध्ये आवळ्याला विशेष महत्त्व असून त्याचे बरेच फायदेही सांगितले आहेत. उन्हाळ्यात होणारे आम्लपित्त, लघवी साफ न होणे, पचनाच्या किंवा पोटाच्या तक्रारींवर आवळा कँडी खाणे फायदेशीर असते. तसेच आवळा खाल्ल्याने उन्हामुळे होणारी मळमळ कमी होते, तरतरी येते. आवळ्याचे मोरावळा, सरबत, लोणचे, कँडी, सुपारी असे बरेच प्रकार होतात. सध्या धकाधकीचे जीवन असल्याने आपल्यातील अनेकजण बाजारात रेडीमेड मिळणारे पदार्थ घेणे पसंत करतात. पण घरीही अगदी विकतच्यासारखी आवळा कँडी सहज करता येते. यंदा थंडीच्या सिजनमध्ये जर आपल्या घरात आवळे विकत आणले असतील तर आवळा कँडी नक्की ट्राय करून पहा. पाहूयात आवळा कँडीची सोपी रेसिपी(How to Make Amla Candy).
साहित्य :-
१. आवळा - १/२ किलो२. पाणी - २ कप ३. साखर - १/२ कप ४. पिठीसाखर - १ टेबलस्पून
तुपासाठी साय साठवताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, साय खराब होणार नाही, तूपही निघेल भरपूर...
शिळ्या चपातीची चमचमीत भेळ, फक्त १० मिनिटांत करा चायनीज भेळेसारखीच चटपटीत चपाती भेळ...
कृती :-
१. सगळ्यांत आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावेत. २. आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हे आवळे घालून १५ ते २० मिनिटे उकळवून घ्यावेत. ३. उकळवून शिजवून घेतलेल्या या आवळ्याच्या लहान लहान फोडी करुन घ्याव्यात. ४. आता एक काचेची बरणी घेऊन त्या बरणीत या आवळ्याच्या फोडी घालून त्यावर साखर घालावी. साखर घातल्यानंतर बरणीचे झाकण गच्च बंद करून घ्यावे.
गुलाबी थंडीत गरमागरम मसाला दूध तर हवंच! पाहा दूध मसाला करण्याची परफेक्ट रेसिपी...
५. आता संपूर्ण एक दिवस ही बरणी तशीच ठेवून द्यावी. त्यातील साखर विरघळून त्याचा पाक तयार होईल. या पाकात आवळ्याच्या फोडी व्यवस्थित भिजतील याची काळजी घ्यावी. ६. आवळे साखरेच्या पाकात भिजल्यानंतर एक गाळण घेऊन पाक गाळून घ्यावा. ७. त्यानंतर या आवळ्याच्या फोडी एक एक करून ताटात ठेवाव्यात. ८. आता हे ताट २ दिवस उन्हांत ठेवून या आवळा कँडी व्यवस्थित सुकवून घ्या. ९. सुकवून घेतल्यानंतर त्यावर थोडीशी पिठीसाखर भुरभुरवून घ्यावी.
आता आपल्या आवळा कँडी खाण्यासाठी तयार आहेत. या आवळा कँडी एका हवाबंद डब्यात भरून व्यवस्थित स्टोअर करुन ठेवाव्यात.