Join us  

हिवाळ्यात ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढवायची तर प्या ' आवळा शॉट्स', रेसिपी सोपी आणि चव अप्रतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 11:10 AM

Vitamin C Amla Shots Recipe :आवळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून, घरच्या घरी आवळा शॉट्स बनवून त्याचा आस्वाद घ्या.

प्रत्येक ऋतूंमध्ये हवामान सारखे बदलत असते. या बदलत्या हवामानाचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडत असतो. या बदलांना सामोरे जाण्यासाठी निसर्गच आपल्याला मदत करत असतो. डिसेंबर महिन्यात थंडीमुळे वातावरणात गारठा जाणवतो. या गारठ्यामुळे आपल्याला वरचेवर सर्दी - खोकला असे आजार उद्भवतात. परंतु या ऋतूंमध्ये येणाऱ्या आवळ्याचा वापर करून आपण या आजारांपासून दूर राहू शकतो. आवळ्याचा रस पौष्टिक आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. यात व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आवळा हे हिरवट रंगाचे तुरट आणि आंबट फळ असून त्याचा औषधी म्हणून उपयोग होतो. आवळ्याचे चुरण, लोणचे, कँडी आणि जॅम बनवून सेवन केले जाते. कच्चा आवळा किंवा त्याचा रस निरोगी राहण्यासाठी उत्तम मानला जातो. या हिवाळ्यात आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवळा शॉट्स कसे बनवायचे याची रेसिपी समजून घेऊयात. meghna’sfoodmagic या इन्स्टाग्राम पेजवर आवळा शॉट्सची रेसिपी शेअर करण्यात आली आहे (Vitamin C Amla Shots Recipe).

 

साहित्य - 

१. आवळा - १० ते १२२. आलं - छोटा तुकडा ३. जिरे पावडर -  १ टेबलस्पून ४. गूळ - १ टेबलस्पून ५. पुदिन्याची पान - १ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार ७. पाणी - गरजेनुसार

कृती -

 १. आवळ्याचे छोटे - छोटे तुकडे करून घ्या. २. मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे छोटे तुकडे, बारीक चिरलेले आलं, जिरे पूड, पुदिन्याची पान, गूळ, चवीनुसार मीठ व पाणी हे एकत्रित फिरवून घ्यावे. ३. मिक्सरच्या भांड्यातील पातळ मिश्रण गाळणीच्या साहाय्याने एका भांड्यात गाळून घ्या. ४. गाळून घेतलेला आवळ्याचा रस छोट्या कप किंवा शॉर्ट्स ग्लासमध्ये सर्व्ह करा. ५. सर्व्ह करताना वरून चिमूटभर जिरे पावडर घालून गार्निशिंग करावे.  

आवळा शॉट्स पिण्यासाठी तयार आहे.

 

टॅग्स :पाककृतीअन्नहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजी