Lokmat Sakhi >Food > चहा प्या, निवांत जगा! चहा प्याल्यानं अकाली मृत्यूचा धोका कमी होतो, संशोधनाचा दावा

चहा प्या, निवांत जगा! चहा प्याल्यानं अकाली मृत्यूचा धोका कमी होतो, संशोधनाचा दावा

इंग्लंडच्या आरोग्य संस्थेनं केलेले संशोधन सांगते की दिवसाला २/३ कप चहा पिणे आरोग्यासाठी चांगलेच नाही तर आयुष्यमानही वाढते. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2022 02:53 PM2022-09-07T14:53:38+5:302022-09-07T14:55:52+5:30

इंग्लंडच्या आरोग्य संस्थेनं केलेले संशोधन सांगते की दिवसाला २/३ कप चहा पिणे आरोग्यासाठी चांगलेच नाही तर आयुष्यमानही वाढते. 

Drink tea, stay safe! Drinking tea reduces risk of death, claims research | चहा प्या, निवांत जगा! चहा प्याल्यानं अकाली मृत्यूचा धोका कमी होतो, संशोधनाचा दावा

चहा प्या, निवांत जगा! चहा प्याल्यानं अकाली मृत्यूचा धोका कमी होतो, संशोधनाचा दावा

Highlightsगीच मन मारुन जगण्यापेक्षा चहा पिणं आणि एनजॉय करणं योग्य!

शांत रहा, निवांत चहा प्या आणि भरपूर जगा असा सल्ला तुम्हाला कुणी दिला तर म्हणाल सोपंय का ते? केवढा स्ट्रेस आहे आणि चहा पिऊन पित्त होणार, भूक मरते आणि त्रासच होतो. हे असं सारं बोलणाऱ्यांनी चहाला फार बदनाम केलं. त्यात कॉफीला ग्लॅमर, चहा पिणारे म्हणजे टपरीवाले लो क्लास असाच काय तो तोरा. पण चहा पिणाऱ्यांचंच नाही तर चहाचंही नशिब बदलतं. आणि त्याला एकदम सायंटिफिक ग्लॅमर येतं. जे म्हणतं की, चहा प्याल तर हार्टचा त्रास होण्याचा, रक्तवाहिन्या आकूंचन पावण्याचा आणि स्ट्रोक येण्याचा धोका ९ ते १३ टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे जास्त काळ जगायचं असेल तर दिवसाला २ ते ३ कप चहा अवश्य प्या!

(Image : google)

इंग्लंडच्या नॅशनल कॅन्सर इन्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी नुकतेच हे संशोधन प्रसिध्द केले आहे. आजवर आरोग्य आणि चहा यासंदर्भात झालेले सर्व संशोधन ग्रीन टी संदर्भातच झाले होते. मात्र पहिल्यांदाच ब्लॅक टीच्या अनुषंगाने हे संशोधन झाले. आणि अभ्यासांती असे समजते की जे लोक दिवसाला २ आणि ३ कप चहा पितात त्यांचा मृत्यूचा धोका अनुक्रमे ९ आणि १३ टक्क्यांनी कमी होतो. त्यांना हार्टचे त्रास, रक्तवाहिन्या आंकूचन पावण्याचे त्रास, महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होत असल्याचे आजार होण्याचा धोका इतरांपेक्षा कमी असतो. त्यांचं आयुष्यमानही वाढतं आणि अकाली मृत्यूचा धोका टळतो.
त्यामुळे तुम्ही चहा पीत असाल आणि दिवसाला २ किंवा ३ च कप चहा पीत असाल तर इतरांचे चहा कमी कर, कमी हे सल्ले ऐकू नका. त्यापेक्षा प्रमाणात चहा प्या, ग्रीन टी प्या आणि एन्जॉय करा तुमचं चहाचं प्रेम.
मुळात चहा पिणं हे गप्पांचं निमित्त, कामात आलेलं रटाळपण दूर करणं आणि फ्रेश होणं यासाठी सोपा मार्ग. त्यामुळे चहाची तलफ ठरल्यावेळी येतेच. मग प्या चहा, उगीच मन मारुन जगण्यापेक्षा चहा पिणं आणि एनजॉय करणं योग्य!
 

Web Title: Drink tea, stay safe! Drinking tea reduces risk of death, claims research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.