Join us

अरे बापरे चुकीच्या पद्धतीने नारळ पाणी पिणं ठरू शकतं जीवघेणं, ‘ही’ योग्य वेळ विसरु नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:39 IST

जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने नारळ पाणी प्यायलात तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकतं.

उन्हाळ्यात नारळ पाणी हे एक जबरदस्त नॅचरल ड्रिंक आहे, जे शरीराला हायड्रेट करतं आणि फ्रेश ठेवण्यासही मदत करतं. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने नारळ पाणी प्यायलात तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकतं. चुकीच्या पद्धतीने नारळ पाणी प्यायल्याने एका ६९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेव्हा तुम्ही चुकीच्या पद्धतीने स्टोर केलेलं नारळ पाणी पिता तेव्हा फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. 

असं पिऊ नका नारळ पाणी 

नारळ फोडल्यानंतर लगेच नारळ पाणी प्या. नारळ पाणी कधीही रेफ्रिजरेटरमध्ये किंवा बाहेर जास्त वेळ स्टोर करून ठेवू नका. यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी तसंच ठेवणं घातक ठरू शकतं. ओलावा आणि उष्णतेमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका असतो, ज्यामुळे तुम्हाला उलट्या, मळमळ, पोटदुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय असं नारळ पाणी प्यायल्याने फूड पॉयझनिंग, डायरियासारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात.

नारळ पाणी कसं करायचं स्टोर?

नारळ पाणी एका हवाबंद डब्यात झिपलॉक बॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. जास्त वेळ साठवणं घातक ठरू शकतं.

नारळ पाणी पिण्याची योग्य पद्धत

नारळ फोडल्यानंतर लगेच पाणी प्या. सकाळी उपाशी पोटी नारळ पाणी पिणं सर्वात जास्त फायदेशीर आहे. याशिवाय वर्कआऊट केल्यानंतर किंवा उन्हातून घरी आल्यावर प्या. हे तुमचं शरीर हायड्रेटेड ठेवतं आणि इलेक्ट्रोलाइट्स बॅलेन्स करतं.

नारळ पाण्यामध्ये कमी कॅलरीज, जास्त इलेक्ट्रोलाइट असतात, जे तुमचं वजन लवकर कमी करण्यास मदत करू शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नारळ पाणी प्या. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य