Join us  

उन्हाळयात सोलकढी प्यायली की आत्मा तृप्त होतो, पाहा सोलकढीची पारंपरिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 11:20 AM

Konkani Style Solkadhi Recipe सोलकढी म्हणजे ताकासाठी असलेला पर्याय, चवीला आंबट तिखट हा पेय आरोग्यासाठी आहे फायदेशीर..

उन्हाळ्यात शरीराची काहिली झाली की, आहारात अनेक बदल घडतात. आपण शरीराला अधिक थंडावा देणारे पदार्थ खातो. पचनास मदत करणारे व शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवणारे पदार्थ आहारात आणतो. सोलकढी हा असाच एक पदार्थ आहे, जो अनेक भागांमध्ये जिरवणी म्हणून प्यायला जातो.

कोकणातील हा पदार्थ असला तरी, प्रत्येक ठिकाणी त्याची बनवण्याची पद्धत ही थोड्याफार प्रमाणात वेगळी आहे. सोलकढी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाचे दूध व कोकमच्या आंबट आगळापासून तयार ही रेसिपी, पचनसंस्थेसाठी उत्तम मनाला गेला आहे. चला तर मग या पदार्थाची कृती पाहूयात(Konkani Style Solkadhi Recipe).

सोलकढी बनवण्यासाठी साहित्य

कोकमचा आगळ

ताज्या नारळाचं दूध

हिरवी मिरची

बारीक चिरलेली कोथिंबीर

लसूण पाकळ्या

गुळाचा चहा करण्याची परफेक्ट पद्धत, उन्हाळ्यातही चहा नासण्याचे टेन्शन नाही, चहा होईल फक्कड

एक टेबलस्पून साखर

चवीनुसार मीठ

सोलकढी बनवण्याची सोपी पद्धत

एका ताज्या नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्या, त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा. सुती कापडाने तयार प्युरी गाळून घ्या, व त्यातून नारळाचे दूध वेगळे काढून घ्या. त्यातून उरलेला चोथा आपण भाज्यांमध्ये वापरू शकता. या ऐवजी आपण रेडीमेड कोकोनट मिल्कचा देखील वापर करू शकता.

एकीकडे पाण्यात कोकम भिजत ठेवा. ज्यामुळे कोकमचा अर्क पाण्यात उतरेल. अर्ध्या तासाने कोकमचे तयार पाणी नारळाच्या दुधामध्ये मिक्स करा. आता त्यात थोडी साखर व चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण मिक्स करा. यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून घाला. आपल्याला लसूण नको असल्यास आपण याला वगळू शकता.

व्हेज तंदूरी पुलावची झटपट रेसिपी-चमचमीत पदार्थ, आवडत्या-नावडत्या सर्व भाज्या पोटात जातील

आता हिरव्या मिरचीला ठेचून मिश्रणात मिक्स करा. यामुळे आंबट तिखट चव सोलकढीला येईल. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण मिक्स करा. आता सोलकढी फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. अशा प्रकारे सोलकढी रेडी आहे. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.