Lokmat Sakhi >Food > शेवग्याच्या शेंगा आणि ओला नारळ, शेवग्याची ‘अशी’ भाजी म्हणजे चवीची कमाल! पोटभर सुख..

शेवग्याच्या शेंगा आणि ओला नारळ, शेवग्याची ‘अशी’ भाजी म्हणजे चवीची कमाल! पोटभर सुख..

drumsticks and coconut fry, the ultimate in taste! Full of happiness : शेवग्याचा हा पदार्थ तुम्ही कधी खाल्लाच नसेल. पाहा काय ही रेसिपी नक्कीच आवडेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 16:39 IST2025-04-04T16:38:26+5:302025-04-04T16:39:28+5:30

drumsticks and coconut fry, the ultimate in taste! Full of happiness : शेवग्याचा हा पदार्थ तुम्ही कधी खाल्लाच नसेल. पाहा काय ही रेसिपी नक्कीच आवडेल.

drumsticks and coconut fry, the ultimate in taste! Full of happiness | शेवग्याच्या शेंगा आणि ओला नारळ, शेवग्याची ‘अशी’ भाजी म्हणजे चवीची कमाल! पोटभर सुख..

शेवग्याच्या शेंगा आणि ओला नारळ, शेवग्याची ‘अशी’ भाजी म्हणजे चवीची कमाल! पोटभर सुख..

शेवगा हा फार पौष्टिक पदार्थ आहे. खरं तर शेवगा सतत खाल्ला पाहिजे, मात्र आपण तो फारच कमी वेळा खातो. शेवग्याची आमटी आपण फार आवडीने खातो. (drumsticks and coconut fry, the ultimate in taste! Full of happiness)घरोघरी ही चमचमीत आमटी तयार केली जाते. शेवग्यापासून विविध पदार्थ तयार करता येतात. मात्र अनेकांना या रेसिपी माहिती नसतात. आमटी आणि भाजी असे दोन पदार्थच लोकांना माहिती असतात. (drumsticks and coconut fry, the ultimate in taste! Full of happiness)शेवगा मुळातच चवीला छान असतो. 

सध्या ट्रेंडींग असलेली मोरींगा पावडर दुसरं काही नसून या शेवग्याचीच पूड आहे. वजन कमी करण्यासाठी शेवगा फार फायदेशीर ठरतो. शेवग्यामध्ये प्रथिने असतात. तसेच अमीनो अॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे अॅसिड शरीरासाठी गरजेचे असते. तसेच बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर हे सगळेही शेवग्यामध्ये असते. भरपूर प्रमाणात लोह असते. शेवगा जीवनसत्त्वांची तर खाणच आहे. महिलांसाठी जीवनसत्त्व 'बी' फार गरजेचे असते. ते ही शेवग्यामध्ये असते. शेवगा अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण करू शकतो. त्यामुळे आहारात शेवग्याचा समावेश असायलाच हवा. शेवग्याची ही रेसिपी पाहा कधी खाल्ली नसेल, एकदा करुन बघा पुन्हा कराल.  

साहित्य 
शेवग्याच्या शेंगा, कडीपत्ता, आलं, मोहरी, जिरे, पाणी, मीठ, लाल तिखट, ओलं खोबरं,  हळद, कोथिंबीर,  तेल

कृती
१. एका पातेल्यामध्ये पाणी उकळवत ठेवा. त्यामध्ये मीठ घाला. शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घ्या. मध्यम आकाराचे तुकडे करा. साल थोडे काढा. जास्त काढू नका. 

२. उकळलेल्या पाण्यामध्ये शेंगा टाका आणि व्यवस्थित शिजू द्या. शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि शेंगा सुक्या करून घ्या. त्यामधील पाणी काढून घ्या. शेंगा एका ताटामध्ये पसरवा. 

३. शेंगा सुकल्यावर त्या मधोमध तोडायच्या म्हणजे एका शेंगेचे दोन भाग करायचे. एका पातेल्यामध्ये तेल घ्या. त्यामध्ये लाल तिखट टाका, हळद टाका तसेच मीठही टाका. सगळं छान मिक्स करा. आणि मग त्यामध्ये शेंगांचे तुकडे टाका. छान मिक्स करून घ्या. नंतर थोडावेळ झाकून ठेवा.

४. एका कढईमध्ये तेल घ्या. त्यामध्ये मोहरी टाका. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाका. तसेच कडीपत्ता टाका. किसलेलं आलं टाका. छान परतून घ्या. त्यामध्ये मसाला लावलेल्या शेंगा टाका. किसलेले ओले खोबरे टाका. छान परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला. कोथिंबीर घाला.    

Web Title: drumsticks and coconut fry, the ultimate in taste! Full of happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.