निरोगी जीवनशैलीसाठी सकस आहार घेणं गरजेचं (Dry Fruits Barfi). व्यायामासोबत पौष्टीक पदार्थ खायला हवे. यासाठी फळं, हिरव्या पालेभाज्या, भाज्या, डाळी आणि सुका मेवा यांचा आहारात समावेश करा (Food). सकाळी उठल्यानंतर किंवा भूक लागल्यावर ड्रायफ्रुट्स खावे (Health). बऱ्याचजणांना बदाम, बेदाणे यांसारखा सुकामेवा खाण्याची सवय असते. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.
काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांसारख्या सुक्यामेव्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे, प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. पण फक्त सुकामेवा खायचा नसेल तर, आपण बर्फी देखील तयार करू शकता. ड्रायफ्रुट्स बर्फी तयार करणं तशी सोपी. काही मिनिटात ही बर्फी तयार होते. गोड खाण्याची इच्छा झाल्यास मिठाईपेक्षा ड्रायफ्रुट्स बर्फी खा(Dry Fruit Barfi Recipe | Sugar Free Khajoor Dry fruits Barfi).
ड्रायफ्रुट्स बर्फी करण्यासाठी लागणारं साहित्य
बदाम
काजू
तूप
पिस्ता
अक्रोड
सूर्यफूल - भोपळ्याच्या बिया
आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका
खजूर
अंजीर
वेलची पूड
कृती
सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात १ चमचा तूप घाला. नंतर त्यात एक कप बदाम, एक कप काजू, अर्धा कप पिस्ता, अक्रोड, एक चमचा सूर्यफुल आणि भोपळ्याच्या बिया घालून भाजून घ्या. भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घ्या.
आजपासून रोज करा फक्त ३ गोष्टी, महिनाभरात थुलथुलीत पोट आणि कंबरेची साइज होईल कमी
नंतर मिक्सरच्या भांड्यात बिया काढलेले खजूर घालून पेस्ट तयार करा. कढईत एक चमचा तूप घालून त्यात खजूरची पेस्ट घालून भाजून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेले अंजीर, भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स, एक चमचा वेलची पूड घालून मिक्स करा.
एका प्लेटमध्ये बटर पेपर लावा, त्यावर मिश्रण ओतून पसरवा. काही वेळानंतर सुरीने वड्या कापून घ्या. अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स बर्फी खाण्यासाठी रेडी. आपण ही बर्फी कधीही कोणत्याही वेळी खाऊ शकता. छोटी भूक भागावण्यासाठी बेस्ट आहे.