Lokmat Sakhi >Food > ड्रायफ्रुट्स खाताना मुलं नाक मुरडतात? झटपट करा पौष्टीक लाडू; मुलांची उंचीही वाढेल-हाडं होतील मजबूत

ड्रायफ्रुट्स खाताना मुलं नाक मुरडतात? झटपट करा पौष्टीक लाडू; मुलांची उंचीही वाढेल-हाडं होतील मजबूत

Dry Fruit Laddu Recipe | No Sugar Healthy Dry Fruits Ladoo : ड्रायफ्रुट्सचे लाडू खाण्याचे फायदे अनेक, फक्त १ खा - दिवसभर राहाल एनर्जेटिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2024 10:00 AM2024-10-01T10:00:13+5:302024-10-01T10:05:01+5:30

Dry Fruit Laddu Recipe | No Sugar Healthy Dry Fruits Ladoo : ड्रायफ्रुट्सचे लाडू खाण्याचे फायदे अनेक, फक्त १ खा - दिवसभर राहाल एनर्जेटिक

Dry Fruit Laddu Recipe | No Sugar Healthy Dry Fruits Ladoo | ड्रायफ्रुट्स खाताना मुलं नाक मुरडतात? झटपट करा पौष्टीक लाडू; मुलांची उंचीही वाढेल-हाडं होतील मजबूत

ड्रायफ्रुट्स खाताना मुलं नाक मुरडतात? झटपट करा पौष्टीक लाडू; मुलांची उंचीही वाढेल-हाडं होतील मजबूत

उन्हाळा असो किंवा पावसाळा ड्रायफ्रुट्स प्रत्येक ऋतूत खाण्याचा सल्ला मिळतो (Dryfruits Laddoo). ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण मिळते. शिवाय गंभीर आजारांचाही धोका कमी होतो (Healthy Recipe). पण काही मुलं ड्रायफ्रुट्स खाताना नाकं मुरडतात. त्यांच्यासाठी आपण खास ड्रायफ्रुट्सचे पौष्टीक लाडू तयार करून देऊ शकता.

ड्रायफ्रुट्सच्या पौष्टीक लाडवांमधून शरीराला प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, जस्त आणि खनिजे मिळतील. ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉलसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो. यासह केस आणि त्वचाही टवटवीत होऊ शकते. ड्रायफ्रुट्सचे पौष्टीक लाडू नक्की कसे करायचे? पाहूयात(Dry Fruit Laddu Recipe | No Sugar Healthy Dry Fruits Ladoo).

ड्रायफ्रुट्सचे पौष्टीक लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य


पिस्ता

मखाणा

काजू

बदाम

भोपळ्याच्या बिया

मासिक पाळी येतच नाही दोन दोन महिने? जीवनशैलीत आजच करा ५ बदल; पीरियड्स येतील वेळेवर

अळशीच्या बिय

सूर्यफुलाच्या बिया

गुळ

तूप

कृती

सर्वात आधी पॅनमध्ये सर्व ड्रायफ्रुट्स घालून भाजून घ्या. भाजलेले ड्रायफ्रुट्स एका परातीत काढून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून पावडर तयार करा.

मुलींना घरात कोंडून घालण्यापेक्षा आईबाबांनी त्यांना शिकवायला हव्या ५ गोष्टी; मुलगी होईल खंबीर..

तयार ड्रायफ्रुट्सची पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक कप गुळ पावडर, एक कप तूप घालून हाताने सर्व साहित्य एकजीव करा. आता हाताला थोडे तूप लावा, आणि लाडू छान वळवून घ्या. अशा प्रकारे ड्रायफ्रुट्सचे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी. आपण हे लाडू दिवसभरात कधीही खाऊ शकता. यामुळे शरीराला उर्जा मिळेल.

Web Title: Dry Fruit Laddu Recipe | No Sugar Healthy Dry Fruits Ladoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.