Join us  

मुलांची नुसतीच उंची वाढते- तब्येत मात्र हडकुळी? 'हा' १ लाडू रोज खायला द्या- धष्टपुष्ट होतील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 12:05 PM

Weight Gain Ladoo For Weak Children: मुलं नुसतीच उंच होत असतील आणि तब्येतीने मात्र अगदीच हडकुळी असतील तर त्यांना लवकरच धष्टपुष्ट करण्यासाठी हा एक उपाय पाहा... (how to make dry fruits ladoo?)

ठळक मुद्देरोज १ लाडू मुलांना खायला द्या. त्यातून मुलांना भरपूर पोषण मिळेल आणि काही दिवसांतच ते तब्येतीनेही भरलेले दिसतील.

लहान मुलांची तब्येत हा त्यांच्या आईसाठी नेहमीच एक चिंतेचा विषय असतो. कारण मुलं व्यवस्थित खात नाहीत. त्यामुळे मग वाढत्या वयातल्या मुलांची नुसतीच उंच वाढत जाते. पण तब्येतीने मात्र ते अगदीच काडी, हडकुळी दिसतात. शिवाय वाढत्या वयातली बहुतांश मुलं खूप चंचल असतात. त्यामुळे त्यांना जरा जास्त एनर्जीची गरज असते, ती बऱ्याचदा त्यांना जेवणातून मिळत नाही. कारण मुलं सगळ्या भाज्या, फळं, कडधान्ये व्यवस्थित खात नाहीत (weight gain ladoo for weak children). म्हणूनच अशा मुलांसाठी एका खास पद्धतीचे लाडू घरात नेहमी करून ठेवा आणि रोज १ लाडू मुलांना खायला द्या (dry fruits ladoo for making your kids strong). त्यातून मुलांना भरपूर पोषण मिळेल आणि काही दिवसांतच ते तब्येतीनेही भरलेले दिसतील.(how to make dry fruits ladoo)

 

मुलांचं वजन वाढण्यासाठी उपयुक्त ठरणारे पौष्टिक लाडू

मुलांचं वजन वाढण्यासाठी किंवा ते व्यवस्थित जेवत नसतील तर त्यांना भरपूर पोषण देणारे लाडू कसे करायचे, याविषयीची रेसिपी kanak_gurnani या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

१ वाटीभर बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता असा सुकामेवा

पोटाला आराम देणारा आणि जिभेचेही चोचले पुरवणारा उपवास कसा करावा? आहारतज्ज्ञ सांगतात ५ टिप्स..

पाऊण वाटी बिया काढून घेतलेले खजूर

पाव वाटी तूप

२ टेबलस्पून नाचणीचं पीठ

२ टेबलस्पून सातूचे पीठ

२ टेबलस्पून कोको पावडर कोको पावडर नाही टाकली तरी चालते.

 

कृती

सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यात सगळा सुकामेवा टाकून मंद आचेवर हलकासा भाजून घ्या. यानंतर तो कढईतून बाजुला काढून थंड होण्यासाठी ठेवून द्या.

बघा पावसाळी दमट हवेतील जंतू, बॅक्टेरिया घालविण्याचा सोपा उपाय, संसर्गजन्य आजारांचा धोकाही टळेल

आता त्याच कढईमध्ये तूप टाका आणि तुपामध्ये सातुचे पीठ, नाचणीचे पीठ टाकून परतून घ्या. यानंतर त्याच मिश्रणात कोको पावडर टाकून सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

 

यानंतर थंड झालेला सुकामेवा मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या. नंतर खजूरही मिक्सरमध्ये फिरवून त्यांची पेस्ट करून घ्या.

वजन झटपट कमी करण्यासाठी नारळपाणी आहे खूप उपयोगी! पण कधी आणि कसं प्यावं? बघा...

आता कढईमधल्या मिश्रणात आधी खजूर पेस्ट आणि मग सुकामेव्याची पावडर टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. गरज पडल्यास त्यामध्ये आणखी तूप टाका आणि हे सगळं मिश्रण थंड झालं की त्याचे लाडू वळून घ्या. हे लाडू ३ आठवडे चांगले राहतात. 

 

टॅग्स :अन्नआहार योजनालहान मुलंवेट लॉस टिप्स