जेवणाला नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खावंसं वाटतं. पण रोज हॉटेलचं खाणं शक्य नसतं अशावेळी घरच्या जेवणात तोंडी लावणीसाठी चटण्या, लोणचं, पापड, कोशिंबीर असं काही असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी. (Spicy dry garlic chutney) लसणाची सुकी चटणी कशी बनवायची. ही चटणी तुम्ही वरणा भात, पुलाव, चपाती, भाकरी कशाहीसोबत खाऊ शकता. लसणात अनेक औषधी गुणधर्म असतात. कच्चा लसूण खाणं कोणालाच आवडत नाही. अशावेळी तुम्ही चटणी बनवून लसणाचा आहारात समावेश करू शकता (Dry Garlic Chutney)
साहित्य
- तेल
- मोहरी
- जिरे
- शेंगदाणे
- लाल मिरची
- कढीपत्ता
- लसुणाच्या पाकळ्या
- तीळ
- लाल मिरची पावडर
- हळद पावडर
- धणे पावडर
- गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- काळे मीठ
- साखर
कृती
1) ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत २ ते ४ टिस्पून तेल गरम करायला ठेवा.
2) तेल गरम झालं की त्यात मोहोरीचे दाणे, जीरं, शेंगदाणे घाला.
3) हे परतून घेतल्यानंतर त्यात लाल मिरच्या, कढीपत्ता, लसूण, तीळ, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर घाला.
4) हे मिश्रण परतून घेऊन एका मिक्सरच्या भांड्यात घाला.
5) काळं मीठ आणि चिमुटभर साखर घालून हे मिश्रण बारीक करून घ्या. तयार आहे सुकी लसणाची चटणी. दुपारी किंवा रात्रीच्या जेवणातही तुम्ही या चटणीचा समावेश करू शकता.