भारतीय जेवणाच्या थाळीत चटण्यांचे फार महत्व आहे. चटण्यांशिवाय जेवणच अपूर्ण आहे. चटणी ताटात घेतल्याशिवाय अनेकांना जेवल्यासारखं वाटतच नाही. (Garlic Chutney Recipe) भाजी आवडती नसेल किंवा भाजीची चव बिघडली तर चटणीमुळे पोटभर जेवतात. लसणाची चटणी चवीला उत्तम लागते. (Dry Garlic Chutney Recipe in Marathi) लसणाच्या सेवनाने इम्यूनिटी वाढते आणि लसणात अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे तब्येतीचे विकार उद्भवत नाहीत. लसूण खाल्ल्याने पचनाचे विकारही दूर राहतात. सर्दी, खोकल्याचा त्रासही सतत उद्भवत नाहीत. (Dry Garlic Chutney Recipe)
लसणाच्या सेवन तुम्ही अनेक प्रकार करू शकता. (Garlic Chutney Dry) पण कच्चा लसूण खायला अनेकांना नको वाटतो. भाजीतून लसूण बाजूला काढून ठेवला जातो. अशावेळी तर तुम्ही लसणाची चवदार, चविष्ट चटणी केली तर चवही अप्रतिम लागेल आणि घरातील सगळेचजण पोटभरून जेवतील. (How to Make Dry Garlic Chutney)
लसणाची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य (Steps For Garlic Chutney)
१) तेल- ४ ते ५ टिस्पून
२) मोहोरी- पाव टिस्पून
३) जीरं- पाव टिस्पून
४) धणे पावडर- अर्धा टिस्पून
५) कढीपत्ता- ८ ते १० पानं
६) काश्मिरी लाल मिरच्या- ५ ते ६
७) सुकं खोबरं- अर्धी वाटी
८) शेंगदाणे- पाव वाटी
९) लसूण- ३ ते ४ लसूण
१०) हळद- अर्धा टिस्पून
११) मीठ - चवीनुसार
लसणाची कुरकुरीत चटणी करण्याची सोपी रेसिपी (Garlic Chutney Easy Recipe)
१) सगळ्यात आधी तेल गरम करून त्यात जीरं, मोहोरी, धणे पावडर, कढीपत्ता, तीळ आणि चिरलेली लाल सुकी मिरची परतवून घ्या. त्यात वाटीभर खोबरं घाला. खोबरं परतून झाल्यानंतर त्यात शेंगदाणे आणि लसूण घाला.
सकाळी भाजलेल्या लसणाची १ पाकळी खा; कोलेस्टेरॉल बाहेर निघेल-म्हातारपणातही निरोही राहाल
२) लसूण परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घाला आणि हे मिश्रण बारीक पावडर होईपर्यंत फिरवून घ्या. तयार आहे लसणाची कुरकुरीत चटणी.
ना डाळ-ना तांदूळ; १ वाटी बेसन पिठाचा करा मऊ-जाळीदार ढोकळा, विकतसारखा परफेक्ट बनेल
३) ही चटणी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. जर तुम्ही साधा वरण भात बनवला असेल तरीही तुम्ही तोंडी लावणीसाठी चटणी खाऊ शकता.