आपण आपल्या छोट्याशा भुकेसाठी नेहमी काही ना काही खायला जवळ ठेवतोच. दोन जेवणांच्यामध्ये आपल्याला कधीही ही छोटीशी भूक लागू शकते. या छोट्या भुकेसाठी व संध्याकाळच्या टी - टाइम स्नॅक्ससाठी कुरकुरीत, मसालेदार, चटपटीत खाणेच आपण अधिक पसंत करतो. संध्याकाळच्या टी - टाइम स्नॅक्ससाठी आपल्याला बहुतेकवेळा वेफर्स, चिवडा, फरसाण, नमकीन शेव, मसालेदार नमकीन खायला आवडते. गरमागरम चहासोबत असे नमकीन, मसालेदार पदार्थ खाण्याची मज्जा काही औरच असते(Dry Mini Farsaan Kachori).
आपण या नमकीन पदार्थांचे पॅकेट्स एकदा फोडले की ते काहीवेळा संपूर्ण संपत नाही. मग असे अर्धे फोडलेले पाकीट आपण परत बंद करून ठेवतो. काहीवेळा एकदा फोडलेल्या या मसालेदार नमकीनचे पाकीट असेच डब्यांत पडून राहते, तर कधी हे नमकीन सादळल्यामुळे फेकून द्यावे लागते. अशावेळी आपण या उरलेल्या मसालेदार नमकीनचा वापर करुन त्यापासून झटपट तयार होणाऱ्या मसालेदार, खमंग, खुसखुशीत कचोऱ्या (Farsan Dry Masala Kachori) घरच्या घरी बनवू शकतो. उरलेल्या मसालेदार नमकीनचा वापर करुन आपण त्यापासून झटपट कचोऱ्या कशा बनवू शकतो, याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Dry Mini Farsaan Kachori).
साहित्य :-
१. कोणत्याही प्रकारचे उरलेले मसाला नमकीन - २ कप २. पिठीसाखर - २ टेबलस्पून ३. चाट मसाला - १ टेबलस्पून ४. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ५. मैदा - २ कप ६. तेल - ५ ते ६ टेबलस्पून ७. मीठ - चवीनुसार८. पाणी - गरजेनुसार
गारठ्याच्या थंडीत घरगुती आवळा कँडी खाऊन ठेवा स्वतःला फिट अँड फाईन, घ्या आवळा कँडीची सोपी रेसिपी...
यंदा गुलाबी थंडीत करा मसालेदार खट्टामिठा पेरु चाट, तोंडाला पाणी सुटेल - घ्या झटपट रेसिपी...
कृती :-
१. आपल्याकडे काहीवेळा बाजारांतून विकत आणलेले मसाला नमकीन हे उरते, असे उरलेले मसाला नमकीन मिक्सरला लावून बारीक वाटून त्याची बारीक पूड करून घ्यावी.२. या मसाला नमकीनच्या बारीक करून घेतलेल्या पूडमध्ये पिठीसाखर, चाट मसाला, लाल मिरची पावडर घालून त्याचे मिश्रण तयार करुन घ्यावे. ३. एका मोठ्या डिशमध्ये मैदा, तेल, चवीनुसार मीठ व गरजेनुसार पाणी घालून कचोरीसाठीच्या पारीचे पीठ मळून घ्यावे.
भेळ करा नाहीतर सॅण्डविच, तयार ठेवा चटपटीत ‘हिरवी चटणी !’ चटणी अशी की पदार्थाला येईल झटपट चव...
४. या पारीच्या पिठाचे छोटे गोळे करून त्याची छोटीशी पारी लाटून घ्यावी. ५. या लाटून घेतलेल्या पारीच्या बरोबर मधोमध मसाला नमकिनचे सारण भरुन घ्यावे. ६. आता सारण भरून घेतलेल्या या कचोऱ्या गरम तेलात खरपूस रंग येईपर्यंत खमंग तळून घ्याव्यात. मध्यम आचेवर या सर्व कचोऱ्या व्यवस्थित तळून घ्याव्यात.
एकाच चवीचे वरण खाऊन कंटाळा आला? मास्टर शेफ पंकज सांगतात, ५ प्रकरच्या फोडण्या - खा चमचमीत...
अशाप्रकारे उरलेल्या मसाला नमकीन पासून तयार केलेल्या खमंग, खुसखुशीत कचोऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. या कचोऱ्या आपण एका हवाबंद डब्यांत भरून महिनाभरासाठी स्टोअर करुन ठेवू शकता.