Join us  

दुधी भोपळा आवडत नसणाऱ्यांनाही आवडतील असे ‘दुधीचे घावन’; इतकं चविष्ट घावन कधी खाल्लं नसेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2023 5:03 PM

Dudhi Bhopala Ghavane- Dudhi Uttapam दुधी भोपळ्याचे घावन किंवा धिरडी, करायला अगदी सोपी आणि पोटभर खावा असा पौष्टिक चविष्ट पदार्थ

उन्हाळा सुरु झाल्यानंतर गावाकडची वाट दिसते. गावाकडे अनेक पदार्थ केले जातात. घावन / अंबोळी हा पदार्थ कोकण व महाराष्ट्रात फार फेमस आहे. तांदळाच्या पीठाचे घावन चवीला उत्कृष्ट लागतात. घावन अनेक प्रकारचे केले जातात. पण आपण कधी दुधी भोपळ्याचे घावन खाल्ले आहे का? दुधी भोपळ्याचे हे घावन छान, कुरकुरीत आणि फक्त स्वादिष्ट लागत नाही तर, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

दुधी भोपळ्यात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे आढळतात. जे लोकं दुधी भोपळा खात नाहीत, त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. रोजचे घावन खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर, दुधी भोपळ्याचे घावन ट्राय करून पाहा. हे घावन काही मिनिटात - कमी साहित्यात तयार होतात. चला तर मग या पौष्टीक पदार्थाची कृती पाहूयात(Dudhi Bhopala Ghavane- Dudhi Uttapam).

घावन करण्यासाठी लागणारं साहित्य

दुधी भोपळा

हिरव्या मिरच्या

लसणाच्या पाकळ्या

जिरं

ओवा

रवा

तांदळाचे पीठ

हाय - हाय मिरची..चिरल्या-वाटल्यानंतर हातांची आग होते? ६ उपाय, काही मिनिटांत आग होईल कमी

चवीनुसार मीठ

दही

पाणी

कोथिंबीर

फ्रूट सॉल्ट

पाणी

तेल

या पद्धतीने करा दुधी भोपळ्याचे घावन

सर्वप्रथम, बेसिक मसाला तयार करून घ्या, यासाठी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरं, ओवा घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या. दुसरीकडे एका बाऊलमध्ये बारीक रवा, तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ व तयार पेस्ट घालून साहित्य एकजीव करून घ्या. आता दुधी भोपळा सोलून घ्या, व त्याचा किस तयार करा. दुधी भोपळ्याचे हे किस तयार मिश्रणात मिक्स करा. आता त्यात दही व पाणी घालून मिश्रण मिक्स करा. पीठ तयार झाल्यानंतर त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.

कोथिंबीर वडी इतकीच कुरकुरीत आणि भूक वाढवणारी खमंग मेथी वडी, जेवणाची वाढवेल लज्जत

आता तयार मिश्रणावर झाकण ठेऊन १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवा, १५ मिनिटे झाल्यानंतर त्यात, फ्रुट सॉल्ट व थोडे पाणी घालून मिश्रण पुन्हा मिक्स करा. मध्यम आचेवर पॅन गरम करा, व त्यावर ब्रशने तेल लावा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर बॅटर पसरवा, व त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा, २ मिनिटे झाल्यानंतर घावन दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत घावन खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.