सकाळच्या नाश्त्याला बरेचदा आपण वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बनवू खातो. गरमागरम थालीपीठ आणि त्याच्यासोबत घट्ट दही, चटणी, सॉस असला की पटापट थालीपीठ खाऊन फस्त केले जाते. थालीपीठ बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. थालीपीठ अधिक पौष्टिक बनवण्यासाठी आपण त्यात अनेक प्रकारची पीठ व भरपूर भाज्या घालू शकतो. थालीपीठ हा असा पदार्थ आहे की तो आपल्यात सगळं सामावून घेतो. एरवी बीट, दुधी, लाल भोपळा अशा भाज्या दिल्या तर घरातील अनेकांची नाक मुरडली जातात. परंतु हेच पदार्थ जेव्हा थालीपीठात एकरूप होतात तेव्हा अतिशय चवीने थालीपीठ फस्त केले जाते.
दुधी हा तशी बऱ्याचजणांना न आवडणारी भाजी आहे. जेवणाच्या ताटात दुधीची भाजी दिसली की अनेकांचा जेवायचा मूड बदलतो. दुधीमध्ये अनेक उपयोगी पोषकत्तवे असतात. यात आरोग्यासाठी आवश्यक असणारी अनेक पोषकतत्व असली तरीही खाण्यासाठी नकारच दिला जातो. अशावेळी आपण याच दुधीचे चटपटीत थालीपीठ बनवू शकतो. झटपट तयार होणारा हा पदार्थ आरोग्यासाठीही एकदम हेल्दी आहे. जो बनवतानाही तु्म्हाला जास्त मेहेनत घेण्याचीही गरज भासणार नाही. चविष्ट दुधीच्या थालीपीठाची रेसिपी पाहूयात(how to make Dudhi Thalipeeth At Home).
साहित्य :-
१. ज्वारीचे पीठ - १ कप
२. बेसन - १ कप
३. बाजरीचे पीठ - १/२ कप
४. गव्हाचे पीठ - १/४ कप
५. तांदुळाचे पीठ - १/४ कप
६. दुधी - १ कप (किसलेला दुधी)
७. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
८. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (बारीक चिरलेल्या)
९. हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता पेस्ट - १ टेबलस्पून
१०. पांढरे तीळ - २ टेबलस्पून
११. कोथिंबीर - २ टेबलस्पून
१२. हळद - १/२ टेबलस्पून
१३. मीठ - चवीनुसार
१४. धणे पूड - १ टेबलस्पून
१५. पाणी - गरजेनुसार
१६. तेल - गरजेनुसार
एकदाच बनवून ठेवा हे डोसा प्रिमिक्स आणि अगदी १० मिनिटांत करा उडुपी डोसा...
फणसाचे गरे पोटाला बरे, म्हणूनच खा फणसाचे कुरकुरीत वेफर्स - कोकणी पद्धतीची पारंपरिक रेसिपी...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये ज्वारी, बाजरी, तांदुळाचे व गव्हाचे पीठ अशी सगळी पीठ एकत्रित करुन घ्यावी.
२. त्यानंतर त्यात बारीक किसून घेतलेला दुधी, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ, धणे पूड व हिरवी मिरची - लसूण - कढीपत्ता पेस्ट घालावी.
३. आता थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घ्यावे.
४. त्यानंतर या पिठाचे लहान गोळे करून घ्यावेत.
उरलेल्या भाताचा नेहमी फोडणीचा भातच का करावा ? ही घ्या एक झटपट होणारी मसालेदार रेसिपी...
५. आता एक कॉटनचा रुमाल घेऊन तो पाणी लावून किंचित ओला करून घ्यावा.
६. त्यानंतर यावर गोलाकार मध्यम आकाराचे थालीपीठ थापून घ्यावे.
७. थालीपीठ थापल्यावर त्यावर थोडेसे पांढरे तीळ भुरभुरवून घ्यावेत.
८. आता तव्यावर गरम तेल सोडून हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.
हे गरमागरम दुधीचे थालीपीठ चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.