पावसाळा सुरु झाला की लहानग्यांपासून थोरा - मोठ्यांपर्यंत, प्रत्येकाला काहीतरी झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. काही लोकांना रोजची तिच - तिच भाजी खाऊन कंटाळा येतो. जर आपल्याला देखील रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर, चमचमीत डाळ - कांदा ही रेसिपी ट्राय करून पाहा.
गावाकडे भाजी नसल्यावर अनेकदा डाळ - कांदा हा पदार्थ केला जातो. गरमा - गरम भात किंवा चपातीसोबत डाळ - कांद्याची भाजी खाल्ली जाते. तूर डाळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तूर डाळीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, मॅंगनीज आणि प्रथिने हे सर्व घटक आढळतात. शरीराला पौष्टीक व चवीला भन्नाट अशी ही रेसिपी पावसाळ्यात नक्की करून पाहायला हवी(During rainy season, make janjanit dal kanda, a traditional dish you will loved it).
डाळ - कांदा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य
तूर डाळ
तेल
मोहरी
जिरं
हिंग
लसूण
कांदा
कडीपत्ता
कोल्हापुरी मसाला
१ कप गव्हाचं पीठ - अर्धा कप रवा, १० मिनिटांत करा गव्हाचा कुरकुरीत डोसा
मोठ
गोडा मसाला
किसलेलं खोबरं
कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात २ टेबलस्पून तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक टेबलस्पून मोहरी, एक टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून हिंग, व चेचलेला लसूण घालून परतवून घ्या. लसणाला लालसर रंग आल्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा परतवून घ्या, कांद्याला लालसर रंग आल्यानंतर त्यात ५ ते ६ कडीपत्त्याची पानं, २ टेबलस्पून कोल्हापुरी मसाला घालून मिक्स करा.
पावसाळ्यात करायलाच हवा मेदू वड्यांचा खमंग-कुरकुरीत बेत, घ्या मेदूवड्याची पारंपरिक रेसिपी
आता त्यात २ तास भिजवलेली अर्धा कप तूर डाळ घालून मिक्स करा. नंतर चवीनुसार मीठ आणि एक टेबलस्पून गोडा मसाला घालून एकजीव करा. शेवटी थोडं पाणी घालून त्यावर ताट झाकून १० मिनिटांसाठी डाळ शिजवून घ्या. अशा प्रकारे डाळ - कांद्याची चमचमीत भाजी खाण्यासाठी रेडी. आपण त्यावर किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करू शकता.