Lokmat Sakhi >Food > Dussehra Special Food Tips : नेहमी विकत श्रीखंड का आणायचं? घरीच परफेक्ट श्रीखंड बनवून साजरा करा दसरा; ही घ्या झटपट रेसेपी

Dussehra Special Food Tips : नेहमी विकत श्रीखंड का आणायचं? घरीच परफेक्ट श्रीखंड बनवून साजरा करा दसरा; ही घ्या झटपट रेसेपी

Dussehra 2021 Food Tips : श्रीखंड घरी बनवल्याचा फायदा असा होतो की आपण आपल्या आवडीनुसार श्रीखंडात साखर किंवा ड्रायफ्रुट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 02:38 PM2021-10-14T14:38:39+5:302021-10-14T14:44:48+5:30

Dussehra 2021 Food Tips : श्रीखंड घरी बनवल्याचा फायदा असा होतो की आपण आपल्या आवडीनुसार श्रीखंडात साखर किंवा ड्रायफ्रुट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकतो.

Dussehra 2021 Food Tips : How to make tasty Shrikhand at home; Take this instant recipe | Dussehra Special Food Tips : नेहमी विकत श्रीखंड का आणायचं? घरीच परफेक्ट श्रीखंड बनवून साजरा करा दसरा; ही घ्या झटपट रेसेपी

Dussehra Special Food Tips : नेहमी विकत श्रीखंड का आणायचं? घरीच परफेक्ट श्रीखंड बनवून साजरा करा दसरा; ही घ्या झटपट रेसेपी

दसरा म्हटलं की श्रीखंड, पुरणपोळी, गुलाबजाम गोडाचं काय बनवायचं हा विचार सगळ्याच बायकांच्या मनात असतो. वेळेअभावी अनेकजणी बाहेरून श्रीखंड आणतात आणि बाकीचे पदार्थ घरी बनवतात. पण प्रत्येकवेळी बाहेरून श्रीखंड आणण्यापेक्षा घरच्याघरी काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही चविष्ट, चवदार श्रीखंड बनवू शकता. (Shrikhand Recipe) घरी तयार केलेलं श्रीखंड खाण्याची मजाच काही वेगळी असते. घरी बनवल्याचा फायदा असा होतो की आपण आपल्या आवडीनुसार श्रीखंडात साखर किंवा ड्रायफ्रुट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. (How to make shrikhand ?)

श्रीखंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१०० ग्रॅम दही

१ चमचा वेलची पूड

१०० ग्रॅम साखर

१०० ग्रॅम बदाम, पिस्त्याचे तुकडे

पुरण यंत्र 

दूध 

केशर

कृती

सगळ्यात आधी दही स्वच्छ कापडात घ्या आणि व्यवस्थित गोलाकार घट्ट बांधून ठेवून द्या. जेणेकरून दह्यातील सर्व पाणी निघून जाईल. 

रोजचा डाळ भात अधिक चवदार, चविष्ट लागेल; फक्त 'या' ५ टिप्स वापरून फोडणी द्या

हे कापडात बांधून ठेवलंलं दही काहीवेळानंतर एका भांड्यात काढा. त्यात साखर आणि वेलची पूड घालून व्यवस्थित बारीक करून घ्या.

दही पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्या. फेटल्यानंतर दही अगदी मऊ असायला हवं त्यात खडे राहायला नको. आता त्यात आवडीनुसार बदाम आणि पिस्त्याचे काप घाला. 

 रोजच्या जेवणात तोंडी लावायला झणझणीत ठेचा हवाच! या घ्या ५ गावरान ठेचा रेसिपीज 

एका वाटीत दूध घेऊन केशर मिसळा आणि दुधात छान ऑरेंज रंग आल्यानंतर हे दूध दह्यात घाला आणि चमच्याचे व्यवस्थित एकत्र करा.

हे मिश्रण तयार झाल्यानंतर सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून द्या. तयार आहे स्वादिष्ट श्रीखंड.

Web Title: Dussehra 2021 Food Tips : How to make tasty Shrikhand at home; Take this instant recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.