दसऱ्याच्या दिवशी श्रीखंडपुरीबरोबर काय भाजी करावी असा प्रश्न पडतो. (Shahee Paneer Recipe) पिवळी बटाट्याची भाजी, छोले भाजी, भेंडी नेहमीच केली जाते. (Dussehra 2023) यावर्षी तुम्ही झपपट वेगळी डीश ट्राय करणार असाल तर शाही पनीर बनवू शकता. पनीरची भाजी (Dhaba Style Shahee Paneer)
घरी जेव्हा ही डिश बनवली जाते तेव्हा हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखी लागत नाही असं अनेकांचं मत आहे जर तुम्हाला ढाबास्टाईल भाज्या घरी बनवायच्या असतील तर त्याच्या काही टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात.(Restaurant style shahi paneer recipe) ज्यामुळे भाजीच टेक्स्चर आणि चव हॉटेलस्टाईल असेल. अशा भाज्या सगळेचजण आवडीने खातील. (How to make Hotelstyle Shahi Paneer)
१) ढाबास्टाईल शाही पनीर बनवण्यासाठी दोन कांदे, वाटीभर दही, दोन टोमॅटो आणि ४ ते ५ लाल मिरच्या आणि अर्धी वाटी काजूंची आवश्यकता असेल.सगळ्यात आधी काजू गरम पाण्यात ५ ते ७ मिनिटं भिजवा. त्यानंतर कांदा, मिरची आणि टोमॅटो वेगवगळे वाटून पेस्ट बनवून घ्या. काजू मऊ झाल्यानंतर काजूची पेस्टसुद्धा बनवून घ्या. वाटीभर दुधाची सायसुद्धा ही रेसिपी करण्यासाठी लागेल. पनीरचे चोकोनी मध्यम आकाराचे काप करा.
१ वाटी साबुदाणाचा पटकन बनेल खमंग नाश्ता; उपवासाची एकदम सोपी, नवी रेसिपी-चवीला भारी
२) कढईत २ मोठे चमचे साजूक तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात खडा मसाला म्हणजेच जीरं, लवंग, दालचिनी, तमालपत्र घाला. गॅस मंद आचेवर ठेवा अन्यथा पदार्थ जळू शकतात. त्यात कांद्याची पेस्ट घाला. कांद्याच्या पेस्टबरोबर काजूची पेस्ट घालू नका कारण काजू लगेच शिजतात तुलनेने कांदा शिजायला जास्त वेळ लागतो.
३) कांद्याची पेस्ट ब्राऊनिश होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यात आलं-लसणाची पेस्ट घालून परतून घ्या. मग काजूची पेस्ट घाला. त्यात हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर घालून एकजीव करून घ्या. हे मिश्रण अर्धा ते १ मिनिट परतवल्यानंतर त्यात टोमॅटोची प्युरी घाला. नंतर मीठ घालून एकदा ढवळून झाकण ठेवून द्या.
४) ग्रेव्ही दाणेदार दिसायला लागली आणि तूप सुटल्यानंतर झाकण काढून घ्या. मग त्यात धणे पावडर आणि दही घाला पुन्हा झाकण ठेवून १ मिनिटासाठी शिजवून घ्या. यात साधारण ३ कप दुधाची साय घालून एकजीव करून पुन्हा झाकण लावून शिजू द्या.
नवरात्रीचा उपवास सोडताना करा 'अननसाचा शीरा'; मऊ, चविष्ट नैवेद्य झटपट बनेल-सोपी रेसिपी
५) २ ते ३ मिनिटांनी झाकण काढून त्यात गरजेनुसार दूध-पाणी घालून एकजीव करून घ्या. मग त्यात कसुरी मेथी घाला, शेवटी गरम मसाला घाला. त्यात गोडवा येण्यासाठी २ ते ३ चमचे साखर घाला. चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून त्यात पनीरचे तुकडे घाला. पनीरचे तुकडे घातल्यानंतर झाकण ठेवून पुन्हा २ मिनिटं शिजू द्या. तयार आहे गरमागरम ढाबास्टाईल शाही पनीर