Join us  

दसरा स्पेशल : सीताफळाचा गर काढण्याची सोपी ट्रिक वापरून घरीच बनवा दाटसर, गोड बासुंदीचा झक्कास बेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 1:17 PM

How To Make Sitaphal Basundi Recipe At Home : सोप्या टिप्स व रेसिपी वापरुन घरच्या घरीच बनवा विकतसारखी सीताफळ बासुंदी...तोंडाला पाणी आणणारी चव...

'दसरा' (Dussehra Special) सण म्हटला की प्रत्येकाच्याच घरी गोडाधोडाचे पदार्थ हे बनवले जातात. श्रीखंड - पुरी, बासुंदी, खीर, रबडी, गुलाबजाम, रसगुल्ले असे अनेक गोडपदार्थ बनवले जातात. दसऱ्याला प्रत्येकाच्या घरी श्रीखंड - पुरी, बासुंदी - पुरी असा कॉमन बेत तर नक्कीच केला जातो. श्रीखंड - बासुंदी तर आजकाल प्रत्येकजण बाजारातून विकत आणतात. परंतु काही घरांत अजूनही पारंपरिक पद्धतीने बासुंदी ही बनवली जाते. बासुंदी बनवताना ती दूध आटवून त्यात आवडीचे ड्रायफ्रुटस घालूंन मस्तपैकी बेत आखला जातो(How To Make Sitaphal Basundi Recipe At Home).

सध्या सीताफळाचा सीजन सुरु आहे. अशातच बाजारातही सीताफळापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल सुरु असते. आपण सीताफळ रबडी, सीताफळ आईस्क्रीम, मिल्कशेक, सीताफळ बासुंदी (Sitaphal Basundi, Custard Apple Basundi recipe) असे सीताफळाच्या (Dussehra Special Delicious Sitaphal Basundi Recipe) गरापासून तयार होणारे अनेक पदार्थ खाणे पसंत करतो. परंतु प्रत्येकवेळी हे पदार्थ बाजारांतून विकत आणण्यापेक्षा आपण झटपट घरच्या घरीच हे पदार्थ तयार करु शकतो. बाजारांत विकत मिळणारी गोड, ताजी सीताफळ वापरुन आपण त्यापासून दसऱ्याला सीताफळ बासुंदीचा (Sitaphal Basundi : Custard Apple Basundi) बेत करु शकतो. बासुंदीसाठी सीताफळाचा गर काढण्याची सोपी ट्रिक वापरून आपण चटकन तयार होणारी विकतसारखी बासुंदी घरच्या घरीच करु शकतो. दसरा स्पेशल सीताफळ बासुंदी तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Maharashtrian Delicious Sitafal Basundi  For Dasara Diwali Recipe).

साहित्य :- 

१. सीताफळ - २ मोठ्या आकाराची सीताफळ२. दूध - अर्धा लिटर ३. वेलची - ३ ते ४ ४. केसर - १० ते १२ काड्या ५. साखर - १/४ कप ६. आवडत्या ड्रायफ्रूट्सचे काप - ३ ते ४ टेबलस्पून ७. वेलची पावडर - १/२ टेबलस्पून 

श्रीखंड बनवताना लक्षात ठेवा या ८ गोष्टी, दसऱ्याला विकतसारखे मऊ, मुलायम श्रीखंड बनवा झटपट घरच्या घरीच...

भगर कधी कोरडी होते तर कधी अगदीच गचका ? ३ सोप्या टिप्स - भगर होईल मऊ - मोकळी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी दूध एका मोठ्या पातेल्यात घेऊन ते मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवावे. २. दूध व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात सालीसकट वेलची व केसर घालून घ्यावे. मग मंद आचेवर ठेवून हे दूध १० ते १५ मिनिटे आटवून घ्यावे. ३. दूध आटून थोडेसे दाटसर झाल्यावर त्यात साखर, आवडत्या ड्रायफ्रूट्सचे काप घालून सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करुन घ्यावे. ४. आता गॅस बंद करून यात वेलची पूड घालून ती मिक्स करून घ्यावी. 

उपवासाची भजी खाता आली तर काय मजा ना ? करा चमचमीत उपवासाची भजी, पाहा रेसिपी...

आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...

५. त्यानंतर ही तयार झालेले हे दुधाचे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून संपूर्ण थंड होण्यास ठेवून द्यावे. ६. आता सीताफळाचा गर चमच्याने काढून तो मिक्सरमधून हलकेच फिरवून घ्यावा. ७. हा मिक्सरमधील गर एका गाळणीत काढून तो व्यवस्थित गाळून त्याच्या बिया व गर वेगळा करुन घ्यावा. ८. दुधाचे मिश्रण संपूर्णपणे थंड झाल्यावर हा सीताफळाचा गर त्यात घालून चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावा. ९. आता ही तयार बासुंदी सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये किमान १ तास ठेवून द्यावी. 

आपली सीताफळ बासुंदी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम पुरीसोबत ही थंडगार बासुंदी खाण्यासाठी सर्व्ह करावी.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्रीअन्नपाककृती