Join us  

टम्म फुगलेल्या-आतून मऊ पुऱ्या घरीच करा; पीठात हा पदार्थ मिसळा, पुऱ्या जराही तेल पिणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 7:00 PM

Dussehra Special Easy Crispy Soft Puri Recipe (Puri kashi fugvavi) : पुरी बनवायला सोपी असली तरी प्रत्येकालच फुललेल्या, मऊ पुरी बनवायला जमतात असं नाही.

भारतीय अन्नपदार्थांत खाण्यापिण्यात बरीच विविधता आढळते.(Dussehra Special) तेच धान्य-त्याच डाळी वापरून प्रत्येक घरांत वेगवेगळ्या चवीचे,वेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवले जातात. गव्हाच्या पीठापासून बनणाऱ्या चपात्या रोजच्या आहारात भाग आहेत. (Crispy Poori Recipe How To Make Fluffy Poori) गव्हापासून बनवली जाणारी पुरी सण-उत्सवांची शान आहे.  प्रत्येक राज्यात खास प्रसंगांना पुरी भाजी, श्रीखंड पुरी, छोले पुरी असे पदार्थ बनवले जातात. (How to make crispy puri)

पुरी बनवायला सोपी असली तरी प्रत्येकालच फुललेल्या, मऊ पुरी बनवायला जमतात असं नाही. पुऱ्या जास्त तेलकट दिसतात तर कधी हव्या तश्या फुलत नाहीत. दसऱ्याला श्रीखंड पुरी खाण्याचे विशेष महत्व असते. या निमित्ताने तुम्हीसुद्धा पुरी बनवणार असाल पुऱ्या बिघडू नयेत यासाठी सोप्या टिप्स पाहूया. (Cooking Tips)

१) पुरीचे पीठ जास्त कडक किंवा जास्त मऊ असू नये. पुरीचं कणीक मळताना तुम्ही अर्धा कप मैदा आणि पाव कप बारीक रवा  घालू शकता. यामुले  पुरीचे टेक्सचर छान होईल आणि पुऱ्याचे कव्हर छान गोल्डन, कुरकुरीत दिसेल.

मऊ, जाळीदार उपवासाचा ढोकळा घरीच करा; २ जिन्नस वापरून बनेल चविष्ट नाश्ता-सोपी रेसिपी

२) कणकेला तेलाचा हात लावून दोन्ही हातांनी पीठ व्यवस्थित मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून ३० मिनिटांसाठी तसंच ठेवून द्या. त्यानंतर पुरी लाटायला घ्या

३) पुरी लाटताना जास्त जाड किंवा पातळ ठेवू नका, समान लाटा. लाटण्याआधी  गोळ्याला मैदा लावून मग लाटा. पुऱ्या लाटून झाल्यानंतर तुम्ही उशीरा तळणार असाल तर  एका प्लेटमध्ये ठेवून कापडाने झाका. पुऱ्या एकावर एक ठेवू नका त्यामुळे पुऱ्या चिकटू शकतात.

साबुदाणे न भिजवता करा कुरकुरीत उपवासाची भजी; खमंग-कमी तेल पिणाऱ्या भजीची सोपी पद्धत

४) पुरी तळताना छिद्र असलेल्या थोडं चमच्याने दाबा. जेणेकरून जास्त फुलेल. जर तुम्ही गरमागरम खाण्यासाठी पुरी तळत असाल तर मंद आचेवर पुरी तळा.

५) पुरी बनवून बराच वेळानंतर खाणार असाल तर नंतर उच्च आचेवर पुरी तळा. 

पुरी बनवण्याची सोपी पद्धत

पुरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी घट्ट पीठ मळून घ्या.  मळलेलं पीठ  ३० मिनिटांससाठी बाजूला झाकून ठेवून द्या. पीठाचे  २५ ग्रामचे बॉल्स तयार करा त्यानंतर हे बॉल्स व्यवस्थित लाटून त्यांना पुरीप्रमाणे आकार द्या. एका मोठ्या कढईतत तेल गरम करून गरमागरम तेलात पुरी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न