Join us  

Food Tips : पुऱ्या टम्म फुगायला हव्यात? पुरीसाठी पीठ भिजवताना ६ गोष्टी विसरू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 10:15 AM

Dusshera Special Food Tips : पुऱ्या टम्म फुगलेल्या बनण्याासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर पुरी मस्त फुगेल आणि गरजेपेक्षा जास्त तेलही शोधून  घेणार नाही. 

सण उत्सव म्हटले की पुरी, श्रीखंड, पुरणपोळी असे पदार्थ घराघरात बनवले जातात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पंच पक्वान्नांचा स्वयंपाक करून सण साजरा केला जातो. आज दसऱ्याच्या निमित्तानं अनेक घरांमध्ये श्रीखंड पुरीचा बेत असणार पण अनेकदा कितीही मेहनत केली तरी हव्या तश्या पुऱ्या बनत नाहीत म्हणजेच कधी पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात, खूप तेलकट दिसतात तर कधी फुगतच नाहीत.  पुऱ्या टम्म फुगलेल्या बनण्याासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर पुरी मस्त फुगेल आणि गरजेपेक्षा जास्त तेलही शोधून  घेणार नाही. 

साहित्य

3 वाटी गव्हाचे पीठ

१ वाटी मैदा

पाणी आवश्यतेनुसार

चवीनुसार मीठ

1 टीस्पून तेल

तळण्यापुरता तेल

कृती

सगळ्यात आधी परातीत दोन्ही पीठं काढून घ्या. पीठ गाळण्यासाठी गाळणीचा वापर करा अन्यथा या पीठात गुठळ्या राहू शकतात.

नंतर मीठ घालून एकजीव करून घ्या पाण्याच्या मदतीने मळून घ्या. चपातीसाठी मळतो त्या पेक्षा थोडे घट्ट मळून घ्या.तेल लावून झाकण ठेवून 10 मिनिटे ठेवा.

रोजचा डाळ भात अधिक चवदार, चविष्ट लागेल; फक्त 'या' ५ टिप्स वापरून फोडणी द्या

मळलेल्या पीठाचा एक मोठा गोळा घेऊन सूखे पीठ लावून पोळी लाटून घ्या. पातळ पोळी लाटून  नये,त्याने पुरी कडक बनू शकते, जरा साडसार पोळी लाटा त्याचे वाटीच्या मदतीने गोल गोल पुऱ्या कापून घ्या.

कढईतील तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर एक एक करून पुरी सोडा.  एका वेळी जास्त पुऱ्या तळून घेऊ नये,मावतील तितक्या तळून घ्या अन्यथा पुरी व्यवस्थित तळली जात नाही. व्यवस्थित तळली गेली की पुरी टिश्यू पेपर वर काढून घ्या. सगळ्या पुऱ्या अशाच प्रकारे तळून घ्या.

टिप

१) पुरीचं पीठ मळताना त्यात तेलाचं मोहन घालावं जेणेकरून पुऱ्या कुरकुरीत होतात. 

२) पीठ कधीच सैलसर मळू नये त्यामुळे पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात. कुरकुरीत होत नाहीत. पीठ नेहमीच घट्ट असावं

३) पुरीच्या पीठात तुम्ही मीठासह हळदही घालू शकता.

४) पुरी तळताना तेल कडकडीत गरम असावे. नाहीतर पुऱ्या फुगत नाहीत.

रोजच्या जेवणात तोंडी लावायला झणझणीत ठेचा हवाच! या घ्या ५ गावरान ठेचा रेसिपीज 

५) पुरी तळताना चमच्यानं हलकी दाबावी म्हणजे ती फुगते.

६) पुऱ्या लाटल्यानंतर एकमेकांवर ठेवू नये. अन्यथा त्या चिटकतात.

टॅग्स :अन्नपाककृतीदसरा