Join us  

दत्तजयंती विशेष- उपवासाच्या आमटीची खास रेसिपी, आंबट- गोड चवीच्या आमटीने फराळाला येईल रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 12:10 PM

Dutta jayanti Special Upavasachi Aamti Recipe: दत्तजयंतीच्या उपवासानिमित्त ही एक खास आमटी करून पाहा.. उपवासाची आमटी परफेक्ट जमत नसेल तर ही रेसिपी एकदा बघाच..(How to make aamti or curry for fast)

ठळक मुद्देआंबट- गोड- तिखट चवीची अतिशय चटकदार उपवासाची आमटी कशी करायची ते पाहा...

दत्तजयंतीनिमित्त (Dutta jayanti fast) अनेक जण उपवास करतात. या उपवासाच्या दिवशी ही शेंगदाण्याची आमटी करून पाहा. तसेही वर्षभर अनेक जण वेगवेगळे उपवास करतच असतात. उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून मग अनेक जण साबुदाण्यापेक्षा भगर खाण्यास प्राधान्य देतात. भगरीसोबत खाण्यासाठी आपण बऱ्याचदा दाण्याची आमटी करतो (shengadanyachi aamti recipe). पण बऱ्याच जणींना ती हवी तशी परफेक्ट चवीची जमत नाही (How to make aamti or curry for fast). म्हणूनच आता आंबट- गोड- तिखट चवीची अतिशय चटकदार उपवासाची आमटी कशी करायची ते पाहा...(Fast special aamti recipe)

 

उपवासाची आमटी करण्याची रेसिपी 

साहित्य

१ वाटी शेंगदाणे 

३ ते ४ हिरव्या मिरच्या

जया बच्चन म्हणतात- "खूप लाज वाटायची जेव्हा आम्ही झाडांमागे जाऊन सॅनिटरी पॅड....."

२ टेबलस्पून गूळ

२ ते ३ आमसूल

१ ते दिड टेबलस्पून तूप

चवीनुसार मीठ

 

रेसिपी

१. सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्या आणि थंड झाले की मग त्याचे टरफलं काढून घ्या.

२. यानंतर शेंगदाणे, मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये टाका. त्यात थोडं पाणी घाला आणि ते मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. शेंगदाण्याचे हे वाटण अगदी बारीक झालं पाहिजे. तरच आमटीला चव येईल.

केस गळणं कमी करणारे ३ सोपे आयुर्वेदिक उपाय, केस दाट होतील- आरोग्यही सुधारेल

३. यानंतर कढई गॅसवर तापायला ठेवा. त्यात तूप टाका. तूप तापले की मग हे शेंगदाण्याचे वाटण कढईमध्ये टाका आणि चांगले परतून घ्या. एकीकडे पाणी तापायला ठेवा. शेंगदाण्याचे वाटण परतून झाले की त्यात गरम पाणी टाका. साधारण वाटण जेवढे असेल त्याच्या तीनपट पाणी त्यात घाला.

इयरएंड पार्टीसाठी हाय हिल्स घ्यायच्या? ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत बघा सुंदर पार्टीवेअर हिल्स

४. आता या आमटीमध्ये आमसूल, गूळ आणि चवीनुसार मीठ टाका. या आमटीला आता छान उकळी आली की गॅस बंद करा.

५. भगरीसोबत खायला ही आमटी अतिशय चवदार लागते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.