आईस्क्रिम करायचं म्हणजे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर, कॉर्नफ्लॉवर, हॅण्डमिक्सर असं सगळंच लागतं. एवढे सगळे कुटाणे करून बऱ्याचदा आईस्क्रिमचा बेत फसतोच. ते छान मऊ होतच नाही. त्यामुळे मग अनेक जणी घरी आईस्क्रिम करण्याचा नाद सोडून देतात. पण आता ही रेसिपी वापरून एकदा आईस्क्रिम करून पाहा (Easiest recipe of Sitaphal Ice cream). आईस्क्रिमचा बेत मुळीच फसणार नाही. शिवाय या रेसिपीसाठी खूप काही वेगळं विकत आणण्याची किंवा करण्याची गरजच नाही (How to make sitaphal ice cream at home?). फक्त ५ पदार्थ आणि आपलं नेहमीचं मिक्सरचं भांडं वापरून घरच्याघरी अगदी विकतसारखं सिताफळ आईस्क्रिम (custard apple ice cream recipe) कसं तयार करायचं ते आता पाहूया...
सिताफळ आईस्क्रिम करण्याची रेसिपीही रेसिपी इन्स्टाग्रामच्या nehadeepakshah या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
१ कप सिताफळाचा पल्प
१ कप दूध
स्वयंपाक घरातला फक्त १ पदार्थ वापरा, केस गळणं १५ दिवसांतच होईल कमी- करून बघा...
१ कप क्रिम किंवा साय
१ कप मिल्क पावडर
तुमच्या आवडीनुसार अर्धा ते पाऊण कप साखर
कृती
सगळ्यात आधी सिताफळाचा गर मिक्सरच्या भांड्यात टाकून सिताफळाचा पल्प काढून घ्या आणि बिया टाकून द्या
यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात दूध, मिल्क पावडर, साखर आणि क्रिम टाका.
कितीही घासलं तरी कढईचा तेलकटपणा- चिकटपणा जातच नाही? ३ उपाय, कढई होईल स्वच्छ- चकाचक
क्रिम तुम्ही विकतचेही आणू शकता किंवा घरची साय असेल तर ती देखील वापरू शकता.
आता हे सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या आणि एका एअरटाईट डब्यात सेट करायला ठेवून द्या.
कुंडीतल्या मातीचा कस वाढविणारे ३ पदार्थ, माती बदलण्याची गरज नाही- बाग नेहमीच सदाबहार राहील
एअर टाईट डब्याला आधी प्लास्टिकची पिशवी लावून पॅक करा आणि त्यानंतर त्याचे झाकण लावा.
७ ते ८ तासांत चवदार सिताफळ आईस्क्रिम घरच्याघरी तयार.
या आईस्क्रिममध्ये आपण कोणतेही स्टॅबिलायझर किंवा कॉर्नफ्लॉवर वापरत नाही. त्यामुळे सर्व्ह करण्याच्या ७ ते ८ मिनिटे आधी आईस्क्रिम फ्रिजमधून काढून ठेवा. जेणेकरून ते सॉफ्ट होईल.