Join us  

डोसा मस्त कुरकुरीत होण्यासाठी पीठ भिजवण्याची सोपी पद्धत; विकेंडचा बेत होईल झक्कास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 12:48 PM

Easy and Different Dosa Batter Recipe : थोड्या वेगळ्या पद्धतीने डाळ-तांदूळ भिजवण्याची आणि वाटण्याची पद्धत पाहूया...

साऊथ इंडीयन पदार्थ म्हणजे अनेकांच्या आवडीचे. करायला सोपे, पौष्टीक आणि पोटभरीचे असल्याने विकेंडला बऱ्याच घरात आवर्जून इडली, डोसा, उतप्पा असे बेत केले जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या या रेसिपीज चविष्ट असल्याने आवडीने खाल्लेही जाते. यासोबत कधी चटणी, कधी सांबार किंवा बटाट्याची भाजी असे काही ना काही करतो. इडली-डोसाचे पीठ विकत मिळत असले तरी हे पीठ पौष्टीक असावे आणि त्यात डाळींचे प्रमाण जास्त असावे म्हणून आपण घरीच पीठ भिजवतो. बहुतांशवेळा आपण तांदूळ आणि उडदाची डाळ आणि आपल्या आवडीप्रमाणे इतर डाळी एकत्र भिजत घालतो. मग त्या वाटतो आणि पीठ आंबवायला ठेवतो. मात्र आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने डाळ-तांदूळ भिजवण्याची आणि वाटण्याची पद्धत पाहणार आहोत. यामुळे डोसे नेहमीपेक्षा जास्त छान होण्यास मदत होईल. ही पद्धत कोणती आणि ती कशी करायची पाहूया (Easy and Different Dosa Batter Recipe)...

पीठ करण्याची पद्धत...

१. सगळ्यात आधी उडदाची डाळी एका वेगळ्या बाऊलमध्ये भिजत घालायची आणि मग ती मिक्सर करुन घ्यायची.

२. दुसऱ्या एका भांड्यात तांदूळ, हरभरा डाळ आणि मेथ्याचे दाणे हे भिजत घालायचे आणि मग तेही मिक्सरमधून घट्टसर भिजवून घ्यायचे. 

३. ही दोन्ही पीठे एकत्र करुन हाताने चांगली एकजीव करायची आणि मग त्यावर झाकण ठेवून हे पीठ बाजूला ठेवून द्यायचे. 

४. साधारण १० तास हे पीठ झाकून ठेवल्यास ते चांगले आंबायला मदत होते आणि फुलून वर येते. 

५. आता या पीठात फक्त मीठ घालायचे आणि तवा गरम करुन त्यावर तेल घालून छान पातळ डोसे घालायचे. 

६. आवडीनुसार डोश्याच्या वरच्या बाजुनेही तेल किंवा तूप घालून आवडीनुसार डोसा पातळ म्हणजेच कुरकुरीत करु शकतो.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.